शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अमेरिकेच्या विहानपाठोपाठ आता नागालँडच्या अंशचा येलूरच्या मराठी शाळेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:30 IST

मराठी शाळांच्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास वाढत असल्याचे अधोरेखित

इस्लामपूर : नागालँड येथील लष्कराच्या स्कूल रायफलमधून अंश नरेंद्र बुढ्ढे या विद्यार्थ्याचा येलूर (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात प्रवेश झाल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा दूरदूरपर्यंत उमटला आहे.

अंशचे वडील नरेंद्र बुढ्ढे हे नागालँडच्या सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लष्करी सेवेत आहेत. अमेरिकेहून विहान हा आटपाडीच्या शाळेत आला. त्यापाठोपाठ नागालँड येथून अंशसुद्धा आल्याने मराठी शाळांच्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास वाढत असल्याचे अधोरेखित होत आहे.अंश हा आपल्या आईवडिलांसोबत नागालँड राज्यात वास्तव्यास होता. तेथे त्याने लष्कराच्या स्कूल रायफलमधून पहिल्या इयत्तेचे शिक्षण घेतले. मात्र, त्याला तेथे गोडी वाटत नव्हती. त्यामुळे आजोबा गजानन बुढ्ढे यांनी नातू अंश याला येलूरच्या मराठी शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेतून मिळणारे ज्ञान इंग्रजीत मिळू शकत नाही, अशी त्यांची ठाम धारणा आहे.

अंशचे वडील आणि आजोबांनी येलूर शाळेतील उत्कृष्ट शिक्षणाचा दर्जा प्रत्यक्ष अनुभवला होता. मराठी भाषा इंग्रजीपेक्षा सरस असून, संस्कृतीची जपणूक आणि संस्कार इंग्रजी शाळांमध्ये मिळत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. पुढची पिढी संस्कारक्षम राहावी, यासाठी त्यांनी गावातील जिल्हा परिषदेची मराठी शाळा निवडली. शाळा प्रशासनाने अंशचा फुलदाणी आणि शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला. गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी शाळेला अचानक भेट देऊन या नव्या प्रवेशाचे कौतुक केले. त्यांनी शाळेची तपासणी करताना शैक्षणिक गुणवत्तेबद्दल प्रशंसा केली आणि शिक्षकांना प्रोत्साहन दिले.

जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे मार्गदर्शन शाळेला नेहमीच लाभत आहे. यावेळी केंद्रप्रमुख सुधाकर पाटील, मुख्याध्यापक दिनकर नांगरे, उपशिक्षक विजय कोळी, तंत्रस्नेही शिक्षक अनिल लांडगे, उपशिक्षिका पाटील, फिरोजा तांबोळी, सुरेखा जाधव, संगीता सूर्यवंशी व पालक उपस्थित होते.