अपेक्सप्रकरणी आणखी एक छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:31+5:302021-07-03T04:18:31+5:30
अपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव, न्यूरो सर्जन डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य ...

अपेक्सप्रकरणी आणखी एक छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
अपेक्स रुग्णालयात ८७ कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव, न्यूरो सर्जन डॉ. मदन जाधव यांच्याविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधू आणि तीन रुग्णवाहिका चालकांसह १३ जणांना अटक केली आहे. ८७ रुगांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ. महेश जाधव यांची न्यायालयीन काेठडीत रवानगी झाली आहे. अपेक्स रुग्णालयात डाॅ. महेश जाधव यास मदत करणाऱ्या सांगलीतील छातीरोग तज्ज्ञाचा सहभाग निष्पन्न झाला असून पोलिसांनी चाैकशीसाठी पाचारण केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात आणखी एका तज्ज्ञ डॉक्टरांवर अटकेची टांगती तलवार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरांच्या जमीन अर्जावर सोमवारी सांगली सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.