आत्मशक्ती पतसंस्थेच्या कासेगाव शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST2020-12-14T04:38:15+5:302020-12-14T04:38:15+5:30
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कासेगाव शाखेचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ...

आत्मशक्ती पतसंस्थेच्या कासेगाव शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कासेगाव शाखेचा २० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी आत्मशक्ती समूहाचे संस्थापक हणमंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी शाखेत सत्यनारायण पूजा व अल्पोपाहार आयोजित करण्यात आला होता. सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, वाळव्याचे सागर पाटील, ज्येष्ठ संचालक प्रदीप पाटील, रवींद्र पाटील, अरुण कदम, महादेव पाटील, जयवंत जाधव, डॉ. संजय पाटील, निवास पाटील, धनपाल जाधव, डॉ. मुसाअली जमादार, संस्थेचे व्यवस्थापक संजय दाभोळे, शाखा अधिकारी सचिन पाटील, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १३१२२०२०-आयएलएलएम-पेठ न्यूज