शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची अंनिसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 20:13 IST

Astrology Sangli : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यावर्षीपासून सुरु केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

ठळक मुद्देइंदिरा गांधी विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची अंनिसची मागणीवैज्ञानिकांचे निवेदन देणार

सांगली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) यावर्षीपासून सुरु केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.अंनिसने सांगितले की, ज्योतिषाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासानुसार ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा. २००१ मध्ये वाजपेयी सरकारनेही या अभ्यासक्रमाचा निर्णय घेतला होता. प्रचंड विरोधामुळे मागे घेतला होता.

डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांच्या जगाच्या अंताविषयीच्या ५० दाव्यांचा फोलपण सिद्ध केला होता. नोबेल विजेते व्ही. वेंकटरामन यांनीही ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.अंनिसने सांगितले की, इग्नूच्या अभ्यासक्रमातून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोलीय घटनांविषयी अज्ञान आणि भीती पसरली जात आहे. ज्योतिषविषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असताना मुक्त विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरु करणे हे आक्षेपार्ह आहे. कोरोनामध्ये विज्ञानवादी मानसिकतेचे महत्व अधोरेखित झाले आहे, अशावेळी अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देण्याचे शासनाने टाळायला हवे.अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर, कमलाकर जमदाडे, भगवान रणदिवे, राहुल थोरात, फारुख गवंडी, वाघेश साळुंखे, स. नि. पाटील, डॉ. संजय निटवे, इब्राहिम नदाफ यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.वैज्ञानिकांचे निवेदन देणारअंनिसतर्फे देशभरातील प्रमुख २५ वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांना देण्यात येणार आहे. इग्नूमधील ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी त्याद्वारे केली जाणार आहे असे अंनिसने सांगितले.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषEducation Sectorशिक्षण क्षेत्रSangliसांगली