अंजनीत बंगला फोडला

By Admin | Updated: June 25, 2015 01:08 IST2015-06-25T01:04:28+5:302015-06-25T01:08:13+5:30

पाच तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास

Anjnit Bungalow bombed | अंजनीत बंगला फोडला

अंजनीत बंगला फोडला

सावळज : अंजनी (ता. तासगाव) येथील विश्वास निवृत्ती पाटील (वय ५८) यांचा बंगला फोडून चोरट्यांनी पाच तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. विश्वास पाटील हे निवृत्त सैनिक असून त्यांचा ग्रामपंचायतीजवळ बंगला आहे. ते नुकतेच पुण्यात राहणाऱ्या आपल्या मुलाकडे सहकुटुंब गेले होते. बुधवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसले.
घरात गेल्यानंतर कपाटातील साहित्य विस्कटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत रात्री उशिरा तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Anjnit Bungalow bombed