शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणाचे दरवाजे बंद करुन वाचविले जनावरांचे प्राण, उखळू येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 11:53 IST

मुलाची सतर्कता अन् अधिकाऱ्यांचा समन्वय

आनंदा सुतारवारणावती : चांदोली धरणातून पाणी सोडल्यानंतर उखळू (ता. शाहूवाडी) येथील एका शेतकरी महिलेकडील सहा जनावरे नदीपात्रातच अडकली होती; परंतु त्यांच्या मुलाने तातडीने धरण प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनीही सतर्कता दाखवत धरणाचे दरवाजे बंद करुन सहा जनावरांचे प्राण वाचविले. त्यानंतर धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले.चांदोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने धरणाचे वक्राकार दरवाजे उघडून नदीपात्रात २ हजार ४६५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सूचना धरण प्रशासनाने नागरिकांना दिली होती. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी साडे चारच्या दरम्यान चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग नदीपात्रात प्रवाहित झाला. मात्र, उखळू (ता. शाहूवाडी) येथील महिला शेतकरी सविता संजय वडाम व त्यांचा मुलगा अनिकेत हे दोघेजण सहा जनावरे रानात चरण्यासाठी घेऊन गेले होते. ही जनावरे नदीपात्रात उतरली होती. अचानक धरणातून पाणी सोडल्याने ही जनावरे पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच त्यांची चिंता वाढली. जनावरे पाण्यातून वाहून जाण्याची भीती होती. अनिकेतने त्यांच्या घराशेजारी राहणारे नाथा वडाम हे पाटबंधारे विभागात कोल्हापूर येथे कार्यरत आहेत, त्यांना मोबाइलवरून संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तत्काळ ही बाब वारणावती येथील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कळवली. अधिकाऱ्यांनी दोन वक्राकार दरवाजे काही मिनिटांतच बंद केले. नदीपात्रात अडकलेल्या सहा जनावरांना बाहेर काढण्यात आले. पुन्हा चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला.

नदीपात्रात जनावरे अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही दोन्ही दरवाजे बंद केले. नदीपात्रातून जनावरे काठावर गेल्याची खात्री केली. त्यानंतर आम्ही पुन्हा विसर्ग सुरु केला. -गोरख पाटील, शाखाधिकारी, वारणावती

टॅग्स :SangliसांगलीDamधरण