जिल्हा बँकेच्या मतदानासाठी अनिल पिंजारी यांचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:27+5:302021-02-23T04:41:27+5:30

करगणी : जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी अनिल बाबर विकास सोसायटीमध्ये अत्यंत चुरशीने राष्ट्रवादीचे उमेश पाटील व भाजपाच्या गटाचे अनिल ...

Anil Pinjari's resolution for District Bank voting | जिल्हा बँकेच्या मतदानासाठी अनिल पिंजारी यांचा ठराव

जिल्हा बँकेच्या मतदानासाठी अनिल पिंजारी यांचा ठराव

करगणी : जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी अनिल बाबर विकास सोसायटीमध्ये अत्यंत चुरशीने राष्ट्रवादीचे उमेश पाटील व भाजपाच्या गटाचे अनिल पिंजारी यांच्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, अनिलराव बाबर विकास सोसायटीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव घेण्याकामी बैठक आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेने अनेक राजकीय डावपेच आखत शिवसेनेच्या गटातील सदस्याच्या ठरावासाठी प्रयत्न केले होते. मात्र, करगणीतील उमेश पाटील युवा शक्तीने शिवसेनेच्या राजकीय डावपेचावर कुरघोडी करीत भाजपा व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वसमावेशक अनिल पिंजारी यांचा ठराव घेण्यास भाग पाडले.

दरम्यान, अनिल बाबर विकास सोसायटीच्या निवडणुकी दरम्यान सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली होती. मात्र, ठराव करीत असताना शिवसेनेने तालुक्यातील राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपाने ठराव करण्याचे षडयंत्र उमेश पाटील युवा शक्तीने हाणून पाडले. यावेळी अशोक पिंजारी, पिंटू सरगर, सुनील पुकळे, भगवान सरगर, भारत पाटील, मुद्दसर इनामदार, उत्तम माने, महेश पाटील, भारत पाटील, विष्णू खिलारी, सचिन कोळेकर, श्रीधर खिलारी, मनोहर माने, समाधान करांडे, इजाज इनामदार, दुर्वा पाटील, बाळासाहेब करांडे, रघुनाथ चोथे, सत्यवान पिंजारी, प्रकाश गायकवाड, दाजी खिलारी यांनी ठरावासाठी प्रयत्न केले.

चौकट

ग्रामपंचायतीतही सत्तांतर करण्याचा निश्चय

शिवसेना वगळून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये करगणी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयास सर्वांनी सहमती दिली आहे.

Web Title: Anil Pinjari's resolution for District Bank voting