अनिल जोशी यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST2020-12-26T04:22:19+5:302020-12-26T04:22:19+5:30
इस्लामपूर : येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदाचा कार्यभार अनिल जोशी यांनी ...

अनिल जोशी यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला
इस्लामपूर : येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य पदाचा कार्यभार अनिल जोशी यांनी स्वीकारला. संस्थेचे सचिव अॅड. बी. एस. पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
प्राचार्य जोशी यांनी १९८३ मध्ये पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची, तर एसपीएममधून एम. आर्च. ही पदवी मिळविली आहे. प्लॅनिंग, डिझाईनिंग, एस्टीमेशन व कॉस्टिंगसारख्या बांधकाम व्यवसायातील ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आर्किटेक्चरल अॅकॉस्टिक्स डिझाईनमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांचे अनेक संशोधन प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. प्राचार्य जोशी यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा संस्थेतील विद्यार्थ्यांना घडविण्यात आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी होईल, असा विश्वास अॅड. पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य अरुण जाधव, प्राचार्य ए. एम. पाटील, प्राचार्य राम शिंदे, प्राचार्य सोमकांत जावरकर, प्राचार्य संदीप पाटील, प्राचार्य व्ही. पी. सावंत, शास्त्र शाखेचे प्रमुख शशिकांत पाटील, प्रा. अशोक शिंदे, प्रा. मनजित पाटील, प्रबंधक सत्वशील पाटील उपस्थित होते.