शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
8
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
9
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
10
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
11
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
12
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
13
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
14
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
15
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
16
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
17
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
18
सत्ता येते-जाते, साहित्यिक संस्थांवर ‘कब्जा’ हवा! मोक्याच्या जागेसाठी लागल्या राजकीय नजरा
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील वर्दीतील गुंडांची साफसफाई करावी - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 15:05 IST

पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला.

सांगली : पोलीस कोठडीत हत्या झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच यापुढे पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलातील वर्दीतील गुंडांची साफकरावी करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. 

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात पोलीस उप-अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, हा तपास सीबीआयकडे द्यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी शेट्टी बोलत होते. विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. राजू शेट्टी, माकपचे नेते अजित अभ्यंकर व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी समशेरखान पठाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, अनिकेतच्या हत्येमुळे पोलिसांचा समाजातील आदरभाव संपला आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. ते आज सांगलीत जिल्ह्यात असल्याने मोर्चा काढला आहे. मोर्चाद्वारे आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. अनिकेत कोथळे हत्या प्रकरण केवळ उंटावरच्या पाठीवरची शेवटची काडी आहे. अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. ती पोलिसांनी दाबून टाकली आहेत. घनवट कामटेसारखे अनेक पोलीस अधिकारी आजही  मोठ्या पदावर कार्यरत आहेत. इस्लामपूरच्या कुलकर्णी दाम्पत्याचा हत्येचाही तपासही गुंडाळून. मी गेली पंधरा वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडूण येत आहे. पण कधीही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. पण सामान्यांवर न्याय होत असेल तर कधीच गप्प बसत नाही. 

पुढे शेट्टी असेही म्हणाले, पोलीस दलातील भ्रष्ट अधिका-यांना बाजूला केले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी साफसफाई करावी. खरं तर या सर्वपक्षीय मोर्चात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झाडून सहभागी व्हायला पाहिजे होते. पण ते आले नाहीत. कारण पोलिस अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यासाठी ते ‘सुपारी’ घेतात. त्यांचे हातही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. दर तीन वर्षांनी हे लोकप्रतिनिधी मर्जीतील जिल्हा व पोलीस ठाणे देण्यासाठी अधिका-यांकडून खंडण्या घेतात. या लोकप्रतिनिधींचाही बंदोबस्त करायला हवा. जोपर्यंत अनिकेतच्या कुटुंबास न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. तसेच पुन्हा अनिकेत कोथळे होऊ देणार नाही.या मोर्चात पृथ्वीराज पवार, गौतम पवार, कॉ. उमेश देशमुख, अफीब बावा, आश्रफ वांकर, नितीन चव्हाण, महेश खराडे, महेश पाटील, आनंद देसाई, आशीष कोरी, सतीश साखळकर आदी सहभागी झाले होते.

सीआयडीवर विश्वास नाही : पठाणसेवानिवृत्त पोलीस अधिकारी समशेरखान पठाण म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणात सांगलीकरांनी लढा दिल्याने पोलीस प्रमुख व उपअधीक्षकांची बदली झाली. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर कामटेने वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी संपर्क साधला असण्याची शक्यता आहे. कामटेचे ‘कॉल डिटेल्स’ काढून या अधिका-यांचा शोध घ्यावा. त्यांनाही सीआयडीने आरोपी करावे. सीआयडी विभागातील अधिकारी हे पोलिस दलातीलच असतात. शिक्षा म्हणून त्यांची सीआयडीत बदली केली जाते. त्यामुळे सीआयडीच्या तपासावर विश्वास नाही. हा तपास सीबीआयकडे द्यावा. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.

सुपारी घेऊन खून : अभ्यंकरमाकपाचे नेते अजित अभ्यंकर म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणामुळे गुंडाराज व पोलीस राज यामधील फरक आता मिटला आहे. दोन हजाराच्या चोरीसाठी अनिकेतचा जीव घेतला. त्याचा मृतदेह जाळला. यावरुन पोलिसांमध्ये किती गुंडाराज शिरला आहे, याची प्रचिती येते. पोलीस गुंड व दरोडेखोर झाले आहेत. ‘सुपारी’ घेऊन ते संशयित आरोपींचा खून करीत आहेत. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे व उपअधीक्षक दीपाली काळे यांनी कामटेला मदत केली असेल तर त्यांनाही सहआरोपी केल पाहिजे. कोथळे कुटुंबास न्याय देण्यासाठी प्रसंगी राज्यभरात लढा उभा केला जाईल. अनिकेत कोथळेचे संपूर्ण कुटुंबही मोर्चात सहभागी झाले होते. अनिकेतची पत्नी संध्या हिच्या काखेत तिची तीन वर्षाची मुलगी प्रांजल होती. खा. शेट्टी यांनी प्रांजला स्वत:च्या कडेवर घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येईपर्यंत प्रांजल शेट्टी यांच्या कडेवर होती.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसSangliसांगली