अनिकेत कोथळे खटल्याची २६ जुलैपासून सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:08+5:302021-06-30T04:18:08+5:30
सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी २६ ते २८ जुलैदरम्यान होणार आहे. जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विजय ...

अनिकेत कोथळे खटल्याची २६ जुलैपासून सुनावणी
सांगली : बहुचर्चित अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी २६ ते २८ जुलैदरम्यान होणार आहे. जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचाव पक्षाच्या वकील ऑनलाईन सुनावणीला हजर होते. मुख्य सरकारी वकील अरविंद देशमुख न्यायालयात हजर होते. त्यावेळी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे या तरुणाला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मारून मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याची घटना ६ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या संशयितांविरोधात खटला सुरू आहे. लूटमारीच्या संशयावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळे याच्यावर अमानुष थर्ड डिग्रीचा वापर केल्याने पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संशयितांनी अनिकेतचा मृतदेह सुरुवातीला पोलीस गाडीतून आणि नंतर खासगी वाहनाने आंबोली घाटातील निर्जनस्थळी नेऊन जाळून खुनासारख्या गंभीर घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने संपूर्ण राज्याचे पोलीस दल हादरले होते.