शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे खून खटला: तत्कालीन उपअधीक्षकांचा उलटतपास पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 13:29 IST

या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीला सुरुवात झाली.

सांगली : अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीस सोमवारपासून सुरुवात झाली. गत सुनावणीवेळी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांचा सरतपास घेण्यात आला होता. सोमवारी बचाव पक्षाकडून उलटतपास पूर्ण करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फेरतपास घेतला.थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ ला संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या घटनेने राज्याच्या पोलीस दलाला हादरा बसला होता. या खटल्यात सरकारची बाजू विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मांडत आहेत. आजपासून सुनावणीला सुरुवात झाली.या खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे. गेल्या सुनावणीत तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांची साक्ष नोंदवली. अनिकेत कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनिल लाड याची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान साऱ्या खुनाचा उलगडा झाला.घटनास्थळ, महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखविल्याची साक्ष नोंदविल्याचे त्यांनी सरतपासात सांगितले होते. त्यानंतर आज बचाव पक्षाने उलटतपास घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले पत्र, वाहन नोंदी याविषयी विचारण्यात आले. यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. साक्षीदार पाटील यांचा बचाव पक्षाचे ॲड. विकास पाटील-शिरगावकर, ॲड. गिरीश तपकिरे, ॲड. प्रमोद सुतार यांनी उलटतपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी