शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग, गर्भवती कुत्रीवर कुऱ्हाडीने वार; माणसातल्या क्रूरतेने परिसीमा गाठली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:05 IST

इस्लामपूर : दूध आणण्यासाठी निघालेल्या मालकिणीबरोबर असणाऱ्या अमेरिकन जातीच्या कुत्रीने शेजारच्या कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने रागाच्या भरात ...

इस्लामपूर : दूध आणण्यासाठी निघालेल्या मालकिणीबरोबर असणाऱ्या अमेरिकन जातीच्या कुत्रीने शेजारच्या कुत्र्यावर गुरगुरल्याचा राग मनात धरून शेजाऱ्याने रागाच्या भरात गर्भवती असलेल्या अमेरिकन कुत्रीवर कुऱ्हाडीने वार करून माणसातल्या क्रूरतेची परिसीमा गाठली. या गंभीर दुखापतीच्या धक्क्याने तिचा गर्भपातदेखील झाला.इस्लामपूर शहरातील बिरोबानगर परिसरात ही घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मनीषा शिवाजी नांगरे-पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन रामचंद्र वळसे आणि रूपाली सचिन वळसे (दोघे रा. बिरोबानगर, इस्लामपूर) यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्याराचा वापर यासह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मनीषा पाटील या मंगळवारी आपल्या विस्की नावाच्या अमेरिकन बुली जातीच्या कुत्रीसोबत निघाल्या होत्या. यावेळी सचिन वळसे यांच्या घरासमोर त्यांचे कुत्रे बसले होते. त्यावेळी ही अमेरिकन कुत्री त्याच्यावर भुंकत जवळ गेली होती. त्याचा राग सचिन वळसे याला आला होता.त्याच रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने या गर्भवती असणाऱ्या कुत्रीच्या मानेवर व पाठीत वार करून गंभीर जखमी केले, तर रूपाली वळसे हिने तुमचे कुत्रे पुन्हा दारात आले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी मनीषा पाटील यांना दिली.

मुक्या प्राण्याबाबत ही घटना घडली असल्याने पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह हवालदार दीपक ठोंबरे, सचिन यादव, राहुल कुंभार यांना घटनास्थळी पाठवत जखमी कुत्रीला येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया आणि उपचार करून घेत तिचे प्राण वाचवले.

टॅग्स :Sangliसांगलीdogकुत्राCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस