शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाला तोड येईना म्हणून सोसायटी, ग्रामपंचायतीलाच ठोकले टाळे; मिरज तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 13:45 IST

निवडणुकीत नेत्यांनी दिलेली आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही असाही केला आरोप

मिरज : ऊसाला तोड आली नाही म्हणून संतापलेल्या शेतकऱ्याने चक्क ढवळी ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीलाच टाळे ठोकले. ढवळी (ता. मिरज) येथे सोमवारी (दि. ३१) सकाळी हा प्रकार घडला. ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर दुपारी त्याने स्वत:च कुलुपे काढली.सचिन बाळासाहेब गौराजे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेतात सुमारे दीड एकर ऊस लावला आहे. ऊसाची पूर्ण वाढ झाली, तरी तोड येण्याची चिन्हे नव्हती. पाण्याअभावी ऊस वाळण्याचे व उतारा कमी होण्याचे संकट होते. ऊस नेण्यासाठी त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंत्या केल्या. गावातील नेतेमंडळींनाही साकडे घातले, पण ऊस हलण्याची चिन्हे नव्हती. अखेर गौराजे मायलेकाने कंटाळून सोमवारी सकाळी ग्रामपंचायत व सोसायटीलाच कुलुपे ठोकली.गौराजे म्हणाले, सोसायटी व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन सरपंच, सोसायटीच्या अध्यक्षांनी दिले होते. विशेषतः सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षांनी वैयक्तिक मला ऊसतोड आणण्याची हमी दिली होती. पण दिलेले आश्वासन त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजFarmerशेतकरी