शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

‘एसईबीसी’च्या समावेशासाठी अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित, 'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:10 IST

‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत राज्य शासनाने भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले

तासगाव : मराठा समाजाचा ‘एसईबीसी’मध्ये समावेश झाल्यानंतरही, जुन्याच आदेशाप्रमाणे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे मराठा समाजातील महिला अर्जदारांवर अन्याय होत होता. याबाबत ‘अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मधून विशेष वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने अंगणवाडी भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘एसईबीसी’चा समावेश हाेऊन नव्याने प्रक्रिया हाेणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.यापूर्वी मराठा अर्जदारांना ‘ईडब्ल्यूएस’मधून आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र, १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ‘एसईबीसी’मधून आरक्षणाचा लाभ मिळत आहे. अंगणवाडी भरती प्रक्रियेत प्रवर्गनिहाय अतिरिक्त गुणांकनाचा लाभ दिला जातो. ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून यापूर्वी मराठा समाजातील उमेदवारांना अतिरिक्त पाच गुणांचा लाभ मिळतो. ‘एसईबीसी’चा समावेश नसल्याने मराठा समाजातील उमेदवार अतिरिक्त गुणांच्या लाभापासून वंचित राहणार होते.

'लोकमत'च्या वृत्ताची शासनाकडून दखलयाबाबत ‘लोकमत’मधून आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर सकल मराठा समाज आणि आमदार सुमनताई पाटील यांनी शासनदरबारी ‘एसईबीसी’चा समावेश करण्याची मागणी केली होती. ‘एसईबीसी’करिता गुणांकन व अन्य बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याबाबत आयुक्तांनी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण