शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: धक्कादायक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:23 IST

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ...

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सुभाष ऊर्फ भय्या गोविंद कांबळे या नराधमास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. पीडितेच्या आजीने याबाबत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीला मिरज तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिलेने दत्तक घेतलेले आहे. पीडित मुलगी इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. संशयित कांबळे हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. दि. २६ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी अंगणात खेळताना दिसली. संशयित कांबळे याने तिला गोड बोलून घरात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.पीडिता मुलगी घरी गेली. तिला त्रास जाणवू लागल्याने रडू लागली. नातेवाइकांनी तिच्यावर घरगुती उपचार केले. परंतु, तिला जास्तच त्रास होऊ लागला. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची विचारपूस करून वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्काळ ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या आजीने तक्रार दिली. पोलिस निरीक्षक किरण चौगले यांनी तातडीने नराधम कांबळे याला अटक करण्याचे आदेश दिले. कांबळे याच्याविरोधात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) नुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक निरीक्षक कल्याणी शिंदे अधिक तपास करत आहेत.

जिल्ह्यात खळबळजत तालुक्यात काही दिवसांपूर्वी नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मिरज तालुक्यातील कवलापूर येथील नराधमाने चिमुरडीवर बलात्कार केल्यामुळे लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस