शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!
2
ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!
3
गतविजेत्या इंग्लंडला धक्का! युरोपियन संघाविरुद्ध T20 World Cup मध्ये विजयाची पाटी कोरीच
4
अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का
5
महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले
6
"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया
7
कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा
8
"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  
9
Rohit एकटा भिडला, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पराक्रम केला; नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा वर्चस्मा 
10
“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
11
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...
12
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
13
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
14
Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
15
Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
16
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
17
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
18
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
20
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

सर्वोत्तम पोलीस ठाण्यात सांगली जिल्ह्यातील 'हे' पोलीस ठाणे राज्यात पहिले तर देशात सातवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 4:47 PM

केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करते. या निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात

शिराळा : शिराळा पोलीस ठाण्याने देशातील सर्वोत्तम सातवा क्रमांक तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. यामुळे शिराळा शहराचे नाव देशभर प्रसिद्धीस आले आहे. पोलीस ठाण्यात जाताना भीतीने दबकत जाणारा नागरिक परिसराचा झालेल्या कायापालटमुळे आणि मिळणाऱ्या वागणुकीमुळे समाधान व्यक्त करत आहे. या संदर्भातील प्रमाणपत्र राज्य, केंद्रशासित प्रदेशातील दहा पोलीस ठाण्यांना देखील प्रदान केले जाणार आहे.केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करते. या निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात. यासाठी सल्लागार फर्म म्हणून मेसर्स ट्रान्स रूरल अॅग्री कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रा.  लि.ला गृहमंत्रालयाने देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे ओळखण्यासाठी सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली होती . या टीमने शिराळा पोलीस ठाण्याला भेट दिली होती .यासाठी देशातील ७५ पोलीस ठाण्याचे सर्वेक्षण करून १० पोलीस ठाण्यांची निवड झाली होती. आज याबाबत अंतिम निर्णय होऊन शिराळा पोलीस ठाणे देशामध्ये सातवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर  तसेच येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाने पोलीस ठाण्याचा कायापालट केला आहे.

पोलीस ठाण्याची  इमारत, परिसर, याठिकाणी केलेली वृक्ष लागवड,विद्युत रोषणाई, स्वच्छता, सुविधा, गुन्हे, रेकॉर्ड, गुन्हे तपास, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांशी सवांद, गुन्हे निर्गती प्रमाण, सिसिटीव्ही, फलक अद्यावत आदी गोष्टी ची तपासणी व पाहणी केली आहे. हा पूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला आहे.येणाऱ्या नागरिकांना समाधान वाटावे असे वातावरण निर्माण झाले आहे.अशी आहेत भारतातील दहा सर्वोत्तम पोलिस ठाणे१) सदर बझार दिल्ली२) गंगापूर ओरिसा३) भट्टू कलान हरियाणा४) वालपोई , गोवा५) मानवी कर्नाटक६) कडमट आयलंड लक्षद्वीप७) शिराळा , महाराष्ट्र८) थोटीय्याम , तामिळनाडू९) बसंतगर , जम्मू काश्मीर१०) रामपूर चौराम , बिहार

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसshirala-acशिराळा