शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अमोल कोल्हेंचा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही, जोगेंद्र कवाडेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 14:22 IST

रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी

सांगली : रिपब्लीकन ऐक्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी असे आवाहन पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले. तर, यावेळी त्यांनी गांधीहत्या आणि नथुराम गोडसेंचे समर्थन करणारा अमोल कोल्हे यांचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला. सांगलीत पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना कवाडे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनुयायी असलेल्या अमोल कोल्हेचा नवा चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. गांधीहत्येचे समर्थन कदापी सहन केले जाणार नाही. राज्य सरकारनेही चित्रपटाला परवानगी देऊ नये. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. आम्ही देखील आवाडेंच्या म्हणण्याशी सहमत आहोत. कोल्हेंना पक्षात घेतलेच कसे? असा आमचा प्रश्न आहे. सरकारने चित्रपटाला परवानगी दिली आणि तो प्रदर्शित झाला, तर राज्यभरात चित्रपटगृहांवर हल्लाबोल करु.तसेच रिपब्लीकन ऐक्यासाठी बाळासाहेबांना अनेकदा विनंत्या केल्या, पण रिपब्लीकन पक्षाशी देणे घेणे नाही असे त्यांचे म्हणणे होते. ऐक्याचे वारंवार आवाहन करणारे आठवले बाळासाहेबांना कितीवेळा भेटले हे देखील महत्वाचे आहे. आठवलेंनी स्वत: भेटून प्रयत्न करावेत. एमआयएमसह अन्य पक्षांना सोबत घेणाऱ्या बाळासाहेबांना रिपब्लीकनबाबत दुजाभाव का? हे कळत नाही. १९९८ मध्ये रिपब्लीकनच्या तिकिटावरच अकोल्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते, हे लक्षात ठेवावे. ते येणारच नसतील, तर त्यांना सोडून ऐक्याचे प्रयत्न करावे लागतील असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, डेमोक्रॅटीक पक्षाचे प्रा. सुुकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, संजय सोनवणे, गणेश उन्हउणे, गौतम कांबळे, शशिकांत सोनवणे, युसुफ शेख, यंगाप्पा शेट्टी, मलीक पठाण, सागर वाघमारे, परशराम कोळी, शहाबुद्दीन शेख, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते...तरी मित्रपक्षांना सत्तेत वाटा नाहीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविण्यासाठी मित्रपक्षांनीह हातभार लावला आहे, पण सत्ता मिळून अडीच वर्षे झाली तरी मित्रपक्षांना सत्तेत वाटा मिळालेला नाही. ही राजकीय नितिमत्ता म्हणता येणार नाही. मित्रपक्षांनी यासंदर्भात वारंवार आठवण करुन दिली, तरीही दुर्लक्ष केले जात आहे.रिपब्लीकन ब्रदरहूडआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकात रिपब्लीकन ब्रदरहूड संकल्पना राबविणार आहोत. विखुरलेल्या रिपब्लीकन घटकांना एकत्र आणून निवडणुका लढविल्या जातील. नागपुरात या संकल्पनेची अंमलबजाणी सुरु केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेJogendra Kawadeप्रा. जोगेंद्र कवाडे