शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर अमित देशमुखांनी दाखवला "बाभळगावचा वाडा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 16:06 IST

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सांगली - राज्यातील राजकारणात कधी कोण कोणत्या पक्षात जाईल आणि राजकारणात काय घडेल हे सांगता येणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतरही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर, त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही येथे उमेदवार दिला नाही. त्यामुळे, भाजप सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार का? याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे लातूरचे आमदार आणि काँग्रसचे नेते अमित देशमुख यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा होत आहेत. मात्र, सांगलीतील विटा येथे बोलताना एका कार्यक्रमात त्यांनी या चर्चांना थेट देशमुख वाडाच दाखवला. 

येथील कार्यक्रमात बसलेल्या काही भाजप नेत्यांकडे पाहात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ही सगळीच मंडळी, खरंतर तुम्ही मला तुमच्या घरी या म्हणताय, पण तुम्हीच स्वगृही परत या, असे म्हणत काँग्रेस नेते आणि माजी आमदार अमित देशमुख यांनी भाजपमधील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. देशमुख यांनी अनेकांना बाभळगावातील देशमुखांचा वाडा दाखवला. तसेच, विट्यातील बर्वे वाड्यातून माझ्या संकल्पनेवर निश्चितच शिक्कामोर्तब होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. कितीही वादळं आली, वारे आले तरी बर्वे वाडा हा तिथंच आहे. तसंच, लातूरचा देशमुख वाडा हाही कितीही वादळं आली, कितीही वारे आले तर तिथंच राहणार, असे म्हणत अमित देशमुख यांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. 

लातूरचं देशमुख घराणं हे संस्काराने श्रीमंत आहे, श्रीमंती ही संस्कारातच असायला हवी. सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना, खरं तर कोण कोणत्या पक्षात आहे हे तुम्हाला तरी कळतं का? असा सवालच त्यांनी जनतेला उद्देशून केला. तसेच, राज्यातील हे सध्याचं तिसरं सरकार आहे. पहिलं सरकार अडीच दिवस चाललं, दुसरं अडीच वर्षे चाललं तिसरं किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही आणि चौथं सरकार कधी येईल हेही कुणाला माहिती नाही. सध्या शांतता कोर्ट सुरू होत आहे... असे म्हणत अमित देशमुख यांनी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं. मात्र, आपण काँग्रेसमध्येच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :laturलातूरAmit Deshmukhअमित देशमुखcongressकाँग्रेसBJPभाजपा