शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हौसेखातर पाळले, कंटाळा आल्यावर बेवारस सोडून दिले; मिरजेत गणेश तलावातून अमेरिकन कासवाची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:46 IST

तोंडात गळ अडकल्याने जखमी

मिरज : मिरजेतील गणेश तलावातून एका अमेरिकन कासवाची प्राणिमित्रांनी मुक्तता केली. तोंडात मासेमारीचा गळ अडकल्याने ते जखमी झाले होते. हे कासव कोणाच्या तरी घरातील पाळीव होते. मात्र, नंतर त्याला तलावात सोडून देण्यात आले होते.रेड इअर्ड स्लायडर प्रजातीच्या या विदेशी कासवाच्या तोंडात मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारा गळ अडकल्याचे आढळून आले. प्राणिमित्र सागर झांबरे आणि सम्मेद ठाणेदार यांनी त्याला ताब्यात घेतले. सुधीर चौगुले यांच्या माध्यमातून कासवाला सांगलीत ॲनिमल राहत संस्थेकडे सोपविले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश चित्तोडा आणि सहायक दिलीप शिंगाणा यांनी कासवाला सौम्य भूल देऊन त्याच्या तोंडात खोलवर अडकलेला गळ काढून टाकला. त्याची प्रकृती ठीक झाल्यानंतर वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. प्राणिमित्र किरण नाईक, सचिन साळुंखे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची निगा राखली जात आहे.प्राणिमित्रांनी सांगितले की, या प्रजातीचे कासव भारतात नैसर्गिकरित्या आढळत नाही. घरात पाळण्यासाठी विदेशातून आयात केले जाते. हे कासवही आयात केलेले असावे. त्याच्या मालकाने हौस भागल्यानंतर किंवा अन्य कारणांनी बेवारस स्थितीत गणेश तलावात सोडून दिले. कासवाची ही जात आक्रमक आहे. ती स्थानिक कासवांसोबत अन्न आणि निवाऱ्यासाठी संघर्ष करते. त्यामुळे जैवसाखळी विस्कळीत होते. हे कासव अन्य जलचरांचे जीव धोक्यात आणते.

मालक आणि विक्रेत्याचा बेजबाबदारपणापरदेशी जातीच्या या कासवाची वन विभागाकडे नोंद आवश्यक असते. ते निसर्गात सोडून देता येत नाही. कासवाची विक्री करताना संबंधित विक्रेत्याने याची माहिती ग्राहकाला देणे आवश्यक असते. या कासवाच्या बाबतीत ते विकणारा आणि पाळणारा या दोहोंनी बेजबाबदारपणा दाखविल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी