आंबेडकर क्रीडांगणाचे रूप पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:16+5:302020-12-11T04:53:16+5:30
फोटो १० शीतल ०२ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा कायापालट होणार आहे. ...

आंबेडकर क्रीडांगणाचे रूप पालटणार
फोटो १० शीतल ०२
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा कायापालट होणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी विविध खेळांसाठी हे क्रीडांगण सुसज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सपाटीकरण आणि स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर सुविधा देण्याची मागणी सामाजिक संघटना, खेळाडूंनी केली होती. त्यासाठी आंदोलनेही झाली. आयुक्त कापडणीस यांनी क्रीडांगणाच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. या क्रीडांगणावर विविध खेळांची मैदाने, नागरिकांसाठी वाॅकिंग ट्रॅक, खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल तसेच कमी जागेतील खेळ यासाठी हे क्रीडांगण सुसज्ज केले जाणार आहे. क्रीडांगणाच्या चोहोबाजूनी विद्युत व्यवस्था केली जाणार असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. क्रीडांगणाच्या आवारात असणाऱ्या पॅव्हेलियनमध्ये महापालिका क्रीडाधिकारी यांचे कार्यालय सुरू केले जाणार आहे. क्रीडांगणाची स्वच्छता आणि सपाटीकरण कामास सुरुवात झाली असून आयुक्त कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी कामाची पाहणी केली. यावेळी क्रीडाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.