शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 18:13 IST

Congress, sangli, vishwjit kadam, bjp देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देभाजप सरकारला शेतकरी, कामगारांना अ‍ॅलर्जी : विश्वजीत कदमसांगलीत काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

सांगली : देशातील भाजपच्या सरकारला शेतकरी व कामगारांची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी दोन विधेयक आणून त्याद्वारे या घटकांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शनिवारी केली.सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीनेकाँग्रेस भवनासमोर शनिवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविषयक विधेयकास विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते आदी उपस्थित होते.गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है, नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी, शेतकरी, कामगारविरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. कदम यावेळी म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने जी दोन विधेयके मंजूर केली त्यातून शेतकरी व कामगार वर्ग अडचणीत आला आहे.

या सरकारने वेळोवेळी आपल्या धोरणातून या घटकांविषयीचा द्वेष दाखवून दिला आहे. हे सरकार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करते. त्यांना केवळ उद्योजकांचे भले करायचे आहे. त्यामुळे त्यांना अन्य घटकांशी काही देणेघेणे नाही.काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना अन्नदाता मानते. शेतकरी आणि कामगारांनी या देशाला घडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्गासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. महात्मा गांधींच्या विचाराने आम्ही हे सत्याग्रह आंदोलन करीत आहोत. पृथ्वीराज पाटील यांनी आंदोलनाची भूमिका यावेळी स्पष्ट केली. विशाल पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे यांची भाषणे झाली.विरोधकांनी त्यांचे काम करावेमहाराष्ट्र हा कोणत्या पक्षाचा नसून तो सामान्य माणसांचा आहे. त्यामुळे याचे भान ठेवून विरोधकांनी येथील नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून मदत आणावी. आम्ही आमचे काम केले आहे, त्यांनी आता त्यांचे काम करावे, असा टोला कदम यांनी भाजप नेत्यांना लगावला.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगलीBJPभाजपाVishwajeet Kadamविश्वजीत कदम