कवठेमहांकाळ तालुक्यात सर्व सेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST2021-05-07T04:29:03+5:302021-05-07T04:29:03+5:30
शहरासह तालुक्यात माणसांची गर्दी विरळ झाली. बिनकमाचे फिरणारे रस्त्यावर फिरकले नाहीत. त्यातूनही जे रस्त्यांवर आले. त्यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी चांगलाच ...

कवठेमहांकाळ तालुक्यात सर्व सेवा बंद
शहरासह तालुक्यात माणसांची गर्दी विरळ झाली.
बिनकमाचे फिरणारे रस्त्यावर फिरकले नाहीत. त्यातूनही जे रस्त्यांवर आले. त्यांना कवठेमहांकाळ पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्या दुचाकी वर कारवाई करत दंड वसूल केला.
कवठेमहांकाळ शहरात शांतता होती. मेडिकल, दवाखाने वगळता सर्व काही बंद होते. कवठेमहांकाळ शहरात कोरोनाचे प्रमाण भयानक वाढत असताना हा लाॅकडवूनचा चांगला निर्णय झाल्याचे बोलले जात होते.
शहरातील जुना बसस्थानक, मसोबा गेट, कुची कॉर्नर, स्टँड चौक आदी ठिकाणी कवठेमहांकाळ पोलिसांनी वाहने अडवत कारवाई केली. तालुक्यातील विविध गावातून ही पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी फेरी मारत. घरीच राहण्याचे लोकांना आवाहन केले.
एकूणच शहरात, तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते.