शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सीमाप्रश्नी सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन, आंदोलनापासून भाजप दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 13:47 IST

मराठी भाषिकांना पाठींबा देण्यासाठी होत असलेल्या आंदोलनात सर्वच पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

सांगली : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी सांगलीत भाजप वगळता सर्व पक्ष, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.शेतकरी कामगार पक्षाचे नेते अॅड. अजित सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना याप्रश्नी निवेदनही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांची होणारी कुचंबणा थांबवावी, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, संतपूरसह ८५० गावे केंद्रशासित करावीत, कर्नाटक सरकारकडून सातत्याने होणारे मराठी भाषिकांवरील हल्ले थांबवावेत, हल्ले करणाऱ्या कन्नडिगांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सांगली शाखेचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, कर्नाटकात साठ वर्षाहून अधिक काळ मराठी भाषिक जनता बेळगावसह ८५० गावांचा सीमाभाग महाराष्ट्राला जोडावा म्हणून सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहे. तरीही कर्नाटक सरकार त्यांच्यावर अन्याय करीत आहे. कर्नाटकातील 'मएस'तीच्या कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला आम्ही सहन करणार नाही. सातत्याने कर्नाटक सरकार मराठी भाषिकांची गळचेपी करीत आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या मागणीप्रमाणे मराठी भाषिकांची गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावीत, अन्यथा ती केंद्रशासित करावीत, अशी आमची मागणी आहे.आंदोलनात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे नेते शेखर माने, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर, मयुर घोडके, रावसाहेब घेवारे, चंद्रकांत मैगुरे, अनिल शेटे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, काँग्रेसचे रवी खराडे, नागरिक जागृती मंचचे सतिश साखळकर आदी उपस्थित होते.भाजप आंदोलनापासून दूरमराठी भाषिकांना पाठींबा देण्यासाठी होत असलेल्या आंदोलनात सर्वच पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. आंदोलनापासून भाजप दूर राहिल्याचे दिसून आले.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकBJPभाजपाagitationआंदोलन