शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अजब राजकारण : पुतण्याशी नाते, काकांवर प्रेम... कुंपणावरील नेत्यांची नवी खेळी

By अविनाश कोळी | Updated: September 27, 2023 17:31 IST

माजी मंत्री अण्णा डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांशी स्नेह असल्याचे सांगितले.

सांगली : राजकारण्यांची निष्ठा अन् प्रेम यावर आता फारसा कोणाचा विश्वास उरलेला नाही. सोयीच्या राजकारणाचे रंग जसे राज्यात दिसताहेत तसेच ते जिल्ह्यातही बहरताहेत. जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मात्र, त्यावर खुलासा करताना खरे प्रेम जयंत पाटील व शरद पवारांवर असल्याचे सांगत अजित पवारांशी व्यक्तिगत नात्याचे स्पष्टीकरण दिले. कुंपणावरील अशा राजकारणाने नेते मात्र चक्रावून गेले आहेत.

आपला कोण, परका कोण, स्वार्थी कोण अन् निष्ठावान कोण, या प्रश्नांची उत्तरे लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना सांगणे कठीण झाले आहे. सत्तेच्या रंगात जसे पक्षबदलू नेते रंगून जात आहेत, तसेच दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील समर्थक, कार्यकर्तेही चिंब भिजत आहेत. त्यामुळे राजकीय सभा, कार्यक्रमातून निष्ठा, प्रेम यासारखे शब्दही नेत्यांच्या तोंडून गायब झाले आहेत.चौकट

व्यक्तिगत नाते व प्रेमाच्या कहाण्या

माजी मंत्री अण्णा डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांशी स्नेह असल्याचे सांगितले. दुसरीकडे जयंत पाटील यांच्याशी बंडखोरीचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही अजित पवारांची दोनदा भेट घेतली. त्यांच्याशी कौटुंबिक नाते व निष्ठा जयंत पाटील यांच्याशीच असल्याचा खुलासा त्यांनी नंतर केला.

मंत्रीच म्हणताहेत...कोण कुठे समजत नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कुठे आहे, हेच समजत नाही, असे मत सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दौऱ्यावेळी काढले. यातून त्यांनी राज्याप्रमाणेच जिल्ह्यातील राजकारणात कसा गोंधळ झालाय, हेच स्पष्ट केले.

पेरले तेच उगवले

सांगलीच्या राजकीय इतिहासात शेवटपर्यंत पक्ष व नेत्याशी निष्ठा बाळगून राहण्याची परंपरा अनेकांनी जपली. त्याचबरोबर पक्षबदल करीत, निष्ठांना ठेंगा दाखवत, सोयीचे राजकारण करण्याच्या कहाण्याही अनेक नेत्यांनी नोंदविल्या. नेत्यांनी जे पेरले तेच आता राजकीय जमिनीतून उगवले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही आता सोयीच्या राजकारणाला प्राधान्य देताना दिसत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील