ऐतवडे खुर्दला पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:59+5:302021-09-12T04:29:59+5:30

जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या पुराने आतापर्यंतची सर्वाधिक पाणीपातळी गाठली होती. यामुळे नदी काठावरील अनेक गावांमध्ये पुराने पाणी शिरले. ...

Aitwade Khurd awaits flood relief | ऐतवडे खुर्दला पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

ऐतवडे खुर्दला पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

जुलै महिन्यात वारणा नदीला आलेल्या पुराने आतापर्यंतची सर्वाधिक पाणीपातळी गाठली होती. यामुळे नदी काठावरील अनेक गावांमध्ये पुराने पाणी शिरले. पुरामुळे मातीची घरे जमीनदोस्त झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. धान्य वाहून गेले. पिकेही कुजली. या महापुराने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.

अशावेळी लोकप्रतिनिधींसह अनेकांनी भेटी दिल्या. धीर दिला. शासनस्तरावर नुकसानीचे पंचनामे झाले. आर्थिक मदत जाहीर झाली; परंतु प्रत्यक्षात नुकसानग्रस्तांच्या हाती मदत पडली नाही. ऐतवडे खुर्द मध्ये १५० घरांची पडझड झाली. यामध्ये २५ घरांची पूर्णतः पडझड झाली असून अंशत: घराची पडझडसह पंधरा हजारापासून ते एक लाख ५० हजारापर्यंत शासनस्तरावर मदत जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेक पूरग्रस्त घर दुरुस्तीच्या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पूरग्रस्तांनी महापुराने पडलेल्या घरात शासनाची मदत मिळेपर्यंत राहण्याचा आसरा घेतला आहे.

फोटो-

ऐतवडे खुर्द. येथे महापुराने अशी अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत

Web Title: Aitwade Khurd awaits flood relief