शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बनावट स्टॅम्पपेपर छापण्याचाही अहद शेखचा डाव, सांगली शहर पोलिसांच्या तपासात मिळाले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:45 IST

हुशारीचा गैरवापर

सांगली : भारतीय चलनी नोटाप्रमाणे ५० रुपयांची हुबेहूब दिसणारी बनावट नोट मिरजेच्या अहद शेखने बनवली. छापखान्यातून त्याने सुमारे ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्या. एवढ्यावरच न थांबता त्याने दहा आणि २० रुपयांच्या नोटांचे नमुने बनविले होते. सर्वांत धक्कादायक म्हणजे त्याने बनावट स्टॅम्पपेपर छापण्याचा प्रयत्न केला होता. स्टॅम्पपेपरप्रमाणे दिसणारा कागद आणून ठेवला होता. त्यामध्ये फारसे यश न मिळाल्यामुळे तो पुन्हा प्रयोग करत होता, अशी माहिती पुढे आली आहे.मिरजेतील अहद महंमद अली शेख (वय ४४, रा. शनिवार पेठ, मिरज) याला बनावट नोटा प्रकरणात सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा कलर प्रिंटर, लॅपटॉप तसेच पन्नास रुपयांच्या एक लाख ९० हजारांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद, शाई, प्रिंटिंग मशीन, कागदांची बंडले असा सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने सुमारे ४० लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे.सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक गस्त घालत असताना आकाशवाणी केंद्राजवळ सापळा रचून अहद शेख याला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतल्यानंतर ५० रुपयांच्या बनावट ७५ नोटा आढळल्या. चौकशीत मिरजेत छापखानाच सुरू केल्याचे उघडकीस आले होते. शेख याचे आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता असून ७० रुपयाला बनावट शंभर रुपये तो देत असल्याचे तपासात पुढे आले आहे. शेख याला ‘ब्रेन स्ट्रोक’ चा त्रास असल्यामुळे पोलिसांना खोलवर तपास करण्यात अडथळे येत आहेत.एक वर्षापासून शेख हा ५० रुपयांच्या बनावट नोटा छापत होता. त्याच्याकडे अद्यावत कलर प्रिंटर आढळला आहे. या प्रिंटरवर आजअखेर किती कागदांची छपाई याची माहिती मिळते. त्यावरून शेख याने ४० लाखाच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती मिळाली आहे. ५० च्या नोटेबरोबरच त्याने २० आणि १० ची बनावट नोट चलनात आणल्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तपासात स्टॅम्प पेपर मिळाला आहे तसेच स्टॅम्प पेपरसाठी जो कागद वापरला जातो तो मिळाला आहे. स्टॅम्प पेपर स्कॅन करून छपाईचा प्रयत्न केला होता. परंतु त्यामध्ये फारसे यश आले नाही परंतु भविष्यात त्याचे प्लॅनिंग होते.

पोलिस कोठडीत वाढअहद शेख याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपासासाठी पोलिस कोठडी वाढवून मागितली. न्यायदंडाधिकारी यांनी शेख याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.हुशारीचा गैरवापरकलर प्रिंटर मशीनमध्ये चलनी नोट स्कॅन करून त्याची छपाई करण्यास प्रतिबंध करणारे अद्यावत तंत्र वापरले आहे. परंतु शेख याने लॅपटॉपवर स्कॅन केलेली बनावट नोट घेऊन लॅपटॉपवरून कलर प्रिंटर जोडून छपाई केली आहे. हुशारीचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे दिसून येते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस