शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मेलेल्या सवतीची करणी काढण्यासाठी अघोरी उपाय, कारंदवाडीच्या 'शेंबडेमामा'चा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 16:05 IST

अंनिस आणि आष्टा पोलिसांचे ‘स्टिंग ऑपरेशन’

आष्टा : मेलेल्या सवतीने केलेली करणी काढण्यासाठी अघोरी उपाय करणाऱ्या कारंदवाडीच्या प्रकाश विष्णू शेंबडे पाटील उर्फ मामा याचा भांडाफोड अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली आणि आष्टा पोलिसांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करून केला. त्याच्याविरुद्ध आष्टा पोलिसांनी ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध’ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.आष्टा पोलिस व अंनिसने दिलेली माहिती अशी, प्रकाश शेंबडे पाटील उर्फ मामा हा त्याचे देव्हाऱ्यात ओटी असून, ती आपोआप आलेली आहे असे म्हणून चमत्काराची अंधश्रद्धाही पसरवत होता. अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात यांच्याकडे महिन्यापूर्वी निनावी तक्रार आली होती. याची खातरजमा करण्यासाठी कार्यकर्त्या आशा धनाले, त्रिशला शहा आणि डॉ. सविता अक्कोळे यांना डमी भक्त म्हणून पाठवले. धनाले यांनी सांगितले की, ‘माझी मृत सवत स्वप्नामध्ये येते. मला त्रास देते व माझ्या अंगातून प्रचंड वेदना होतात,’ असे खोटे सांगितले. तेव्हा मामाने भंडाऱ्याचे रिंगण काढून धनाले यांच्या कपाळावर भंडारा लावला. तासभर रिंगणामध्ये बसवले. भंडारा घातलेले पाणी पिण्यास देत पाच रविवार दरबारात यावे लागेल, असे सांगितले.रविवारी सकाळी आष्टा पोलिस ठाण्यात अंनिसचे कार्यकर्ते गेले. शेंबडे पाटील उर्फ मामा मंतरलेला ताईत देऊन अंधश्रद्धा पसरवतो, अशी माहिती दिली. पोलिसांनी अंनिसच्या महिला कार्यकर्त्यांसोबत साध्या वेशात पोलिस दिला. ते कारंदवाडीत मामाच्या दरबारात पोहोचले. आशा धनाले यांनी ‘माझ्या मयत सवतीचा त्रास वाढलेला आहे,’ असे सांगितले. त्यावर उपाय म्हणून भंडाऱ्याच्या रिंगणात बसवले. जीभेवर भंडारा टाकून तुम्हाला बरे वाटेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मंतरलेला ताईत दिला. डॉक्टरांची औषधे घेऊ नका, असे सांगितले. इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवण्यास सांगितले. याचवेळी पोलिस दरबारात आले. त्यांनी मामाचा भांडाफोड केला. पंचनामा करून दरबारातील वस्तू जप्त केल्या.यावेळी आष्टा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहायक पोलिस निरीक्षक मनमित राऊत, दीपक भोसले, प्रवीण ठेपणे, दीपक पाटील, उज्ज्वला पाटील यांनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक मनमित राऊत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस