शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नाराजीच्या विस्तवाने राष्ट्रवादीचे घर पेटले

By admin | Updated: August 11, 2015 00:38 IST

सांगली बाजार समिती : काँग्रेसचे बाहुबल सिद्ध

अंजर अथणीकर-सांगली पक्षांतर्गत संघर्षाच्या विस्तवाने राष्ट्रवादीच्या घराला आग लागली आणि भरल्या बाजारात जयंतरावांच्या सैन्याला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी आणि नेत्यांमधील अति आत्मविश्वास या गोष्टींचा अचूक फायदा घेत काँग्रेसने बाजार समितीमध्ये परिवर्तनाचा झेंडा रोवला. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात कार्यक्षेत्र असणारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी राज्यातील महत्त्वाची संस्था आहे. वार्षिक सुमारे तेराशे कोटीची उलाढाल असणारी व सध्या तीस कोटीहून अधिक ठेव असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असावी, यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील यशानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या निवडणुकीतही तोच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला. भाजप, राष्ट्रवादी व मदन पाटील गट एकत्रित आला, मात्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना सामील करून घेण्यात त्यांना अपयश आले. मध्यवर्ती बँकेत डावलल्याने त्यांची नाराजी होती. तिकीट वाटपातही आजी, माजी संचालकांना पूर्णपणे डावलल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष भानुदास पाटील, माजी सभापती एम. के. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले, बाळू पाटील, आप्पासाहेब पाटील, शिरढोणचे माजी सरपंच शिवाजी कदम, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती जालिंदर देसाई, शिवाजी कदम, जतमधील धनगर समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ असे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारीच्या प्रश्नावरून नाराज होते. या नाराज मंडळींना एकत्रित आणण्यात काँग्रेसमधील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातच कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. इतकी नाराजी वाढत असतानाही जयंत पाटील यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांचा राष्ट्रवादीमधील गटही नाराज होता. निवडणुकीच्या आधी पाच दिवस या नाराज गटाने मेळावा घेऊन उघडपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. नेत्यांकडून ही नाराजी दुर्लक्षित झाल्याने नाराजीत भर पडली. त्यांनी मोट बांधून काँग्रेस आघाडीचा प्रचार केला. पतंगरावांनी नाराजांना सोबत घेऊनच काम करण्याचे आश्वासन दिले. त्यातच शेवटच्या टप्प्यात जयंतरावांनी निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. भाजप नेत्यांनीही म्हणावा तितका जोर लावला नाही. सोसायटी, ग्रामपंचायती संख्येने अधिक ताब्यात असूनही विस्कळीत प्रचारामुळे काँग्रेस आघाडीचा विजय सुलभ झाला. मदन पाटील यांचा गड शाबूतया निवडणुकीत मदन पाटील यांचा गट शाबूत असल्याचे दिसून आले आहे. मदन पाटील हे स्वत: या निवडणुकीत सहज निवडून आले. यासाठी काँग्रेस आघाडीनेही समझोत्याचे राजकारण केले. शिवाय सहकारी गटातून राष्ट्रवादी आघाडीतून निवडून आलेले वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील हेही मदन पाटील गटाचेच मानले जातात. व्यापारी गटातून निवडून आलेले शीतल पाटील, मुुजीर जांभळीकर हे मदन पाटील यांनाच मानणारे आहेत. मात्र त्यांनी सध्या तरी अपक्ष राहण्याची भूमिका घेतली आहे.