शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Women's Day Special: पतीच्या निधनानंतर जिद्दीने सांभाळला व्यवसाय, चिंचणीच्या सुलभा माने यांची संघर्षगाथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:53 IST

सोने-चांदी परीक्षण (टंच) व्यवसाय आणि शेतीही यशस्वीपणे पुढे नेली, पुण्यात ‘त्रिशूल असेअर्स’ची उभारणी

प्रताप महाडीककडेगाव : जीवन अनपेक्षित वळण घेते; पण धैर्य, जिद्द आणि प्रयत्न याच्या जोरावर अडचणींवर मात करता येते, याचा प्रत्यय चिंचणी (ता. कडेगाव) येथील सुलभा सुरेश माने यांच्या संघर्षातून येतो. पतीच्या अकाली निधनानंतर त्यांनी केवळ कुटुंबाची जबाबदारीच उचलली नाही, तर सोने-चांदी परीक्षण (टंच) व्यवसाय आणि शेती यालाही यशस्वीपणे पुढे नेले.सुलभा माने यांचे पती सुरेश माने आणि दीर विकास माने यांनी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून सोने-चांदी गलाई व्यवसाय शिकण्यासाठी १९८८ मध्ये मद्रासला (तमिळनाडू) प्रयाण केले. त्यानंतर काही वर्षांनी पुण्यात ‘त्रिशूल असेअर्स’ नावाने टंच व्यवसाय सुरू केला. व्यवसायाला यश मिळाले; पण २००३ मध्ये विकास माने यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सुरेश माने यांनी खांद्यावर घेतली. २०१० मध्ये सुरेश माने यांच्या किडनीच्या गंभीर आजाराने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्या उपचारासाठी सुलभा माने यांच्या आईने स्वतःची किडनी दान केली. या कठीण काळातही सुरेश माने यांनी व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्या निधनानंतर सुलभा माने यांच्यासमोर कुटुंबाची आणि व्यवसायाची जबाबदारी उभी राहिली. सुलभा माने यांनी हताश न होता व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. स्वतः शिकत त्यांनी व्यवसाय चालू ठेवला. आज पुण्यातील विश्वासार्ह टंच व्यावसायिकांत त्यांची गणना होते. गावातील प्रत्येक सामाजिक कामात त्या मोलाचा वाटा उचलतात.

शेतीतही आधुनिक प्रयोगव्यवसाय सांभाळतानाच त्यांनी आपल्या गावातील कोरडवाहू शेती बागायतीमध्ये बदलली. ताकारी योजनेचे पाणी मिळाल्यामुळे त्यांनी शेतीमध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवले. त्यांनी पुतणी आणि मुलांच्या शिक्षणाची व जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. पुतणीने बी. फार्म पूर्ण केले, तर दोन्ही जुळी मुले दहावीत शिकत आहेत. त्यांनी या मुलांना आदर्श संस्कार दिले आहेत.

महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरणअनेकदा पतीच्या निधनानंतर महिला निराश होतात; पण सुलभा माने यांनी परिस्थितीशी झुंज देत कुटुंब आणि व्यवसाय दोन्ही सांभाळले. त्यांची ही संघर्षगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही, हा त्यांचा संदेश अनेक महिलांना नव्या ऊर्जेने उभे राहण्याची प्रेरणा देतो.

टॅग्स :SangliसांगलीWomen's Day Specialजागतिक महिला दिन