शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये झेडपी निवडणुकीचे राजकारण तापले!, सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:33 IST

महायुती-महाविकास आघाडीची कसोटी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गणांचा अंतिम आराखडा जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, सभापती आणि गट-गणांच्या आरक्षणाकडे लागले आहे. संभाव्य आरक्षण कोणते ठरणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा व कूटनीती सुरू झाली असून, इच्छुकांनी आधीच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी २०१६-१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर जिल्हा परिषदेत प्रशासकीय कारभार सुरू झाला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कोणती निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी आरक्षणाची सोडत मुंबईत होणार असून, त्याच वेळी मतदारयाद्याही जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी होते. सध्याच्या ६१ गट व १२२ गणांच्या नव्या रचनेत गावांच्या सीमांकनात झालेल्या बदलांमुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.सुरक्षित गट-गणांवर इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या असून, संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी आठवड्यांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडतही लवकरच निघणार आहे. या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसची धास्ती आणि मोर्चेबांधणीस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत पायाभूत ताकद असलेल्या काँग्रेसने जूनमध्येच पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा दबाव वाढला आहे. काँग्रेसची स्थानिक ताकद आणि आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांचा प्रभाव यामुळे अनेक गट-गणांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

आरक्षणानंतर तापणार वातावरण!जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. कोणत्या गट-गणाचे आरक्षण कोणाला अनुकूल ठरेल आणि कोणाचे राजकीय गणित बिघडेल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

महायुती-महाविकास आघाडीची कसोटीया निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे; मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये अंतर्गत मतभेद प्रकर्षाने जाणवत आहेत. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा जागावाटपात महाविकास आघाडीचे गणित काही प्रमाणात बिघडले होते; पण सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील एकत्रित प्रचाराची रणनीती आखत आहेत; पण जिल्ह्यात महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांत त्याचे पडसाद उमटत आहेत.