शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

मंजुरीनंतरही ग्रामस्थांना रस्त्याची प्रतीक्षा कायम : वनविभागाच्या परवानगीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 9:57 PM

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची मंजुरी मिळूनही वनविभागाच्या परवानगीनंतरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे रस्ते महामंडळाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून रस्त्याच्या

ठळक मुद्देगणेवाडीकरांचा प्रवास खडतर

मल्हारपेठ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची मंजुरी मिळूनही वनविभागाच्या परवानगीनंतरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे रस्ते महामंडळाकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांतून ‘गणेवाडी, तुझा कधी संपणार वनवास गं..’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर बसलेले गणेवाडी हे छोटेसे गाव. गावात आजही फक्त कमी माल घेऊन जाणारा डम्पिंग ट्रॅक्टर व दूध वाहतूक करणारी तीनचाकी व दुचाकी गाडी वर-खाली करत आहे. गेल्या पंधरा वर्षांत गणेवाडी रस्त्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. मोठे राजकारणही झाले.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नोव्हेंबर २०१८ मध्ये साडेपाच किलोमीटर गावाच्या रस्त्याला मंजुरी मिळाली. तर गत महिन्याच्या सुरुवातीलाच या कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाने विरोध दर्शविला आहे.वनखात्याच्या हद्दीतून रस्ता जात असल्याने वनविभागाची परवानगी घ्या. मगच काम सुरू करू, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याने पुन्हा खडतर प्रवास करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.गणेवाडीतील ग्रामस्थांच्या व्यथेचा विचार केल्यास या गावातून दहा वर्षांपूर्वी झोळी किंवा डोलीतून आजारी व्यक्तींला मल्हारपेठ येथे डोंगर उतरून उपचारासाठी आणावे लागत होते. त्याकडे लक्ष देत माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी गत पंचवार्षिकमध्ये तांबेवाडीकडून रस्त्याचे काम केले. तर आमदार शंभूराज देसाई यांनीही गणेवाडीच्या बाजूने काम केले आहे. मात्र, सध्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. जोपर्यंत शासनाची मंजुरी असूनही जोपर्यंत वनविभागाकडून मंजुरी मिळत नाही. तोपर्यंत ग्रामस्थांना खडतर प्रवास करावा लागणार आहे.विद्यार्थ्यांचा प्रवास खडतरगणेवाडीत सातवीपर्यंत शाळा आहे. आठवीनंतरच्या शिक्षणासाठी आजही मुलांना उरूल किंवा मल्हारपेठ येथे दररोज डोंगर चढ-उतार करून चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. मल्हारपेठ येथील शाळेत चार मुली व तीन मुले दररोज डोंगर चढ-उतार करून येत आहेत. रस्ता नसल्यामुळे आणखी किती दिवस शिक्षणासाठी ही शिक्षा भोगावी लागणार?, असा प्रश्न विद्यार्थ्यांतून विचारला जात आहे. 

मूलभूत गरजांसाठी ग्रामस्थांची दमछाकगणेवाडीची लोकसंख्या पाचशे असून, वाडीत ८० कुटुंबे आहेत. कामधंदा नसल्यामुळे अनेक कुटुंबे व त्यातील लोक मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात आहेत. गावात पाणी, वीज, रस्ता, आरोग्य, शिक्षण या गरजेच्या गोष्टी मिळविण्यासाठी आजही ग्रामस्थांची दमछाक होत आहे.

स्मशानभूमीअभावी उघड्यावरच अंत्यसंस्कारगणेवाडी गाव ठोमसे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून, पहिल्यांदा गणेवाडी येथील महिला सरपंच झाली होती. त्यांनी गावात अंतर्गत सिमेंट रस्ते केले आहेत. मात्र गावात पाणी, आरोग्य, गटारांची सोय नाही. स्मशानभूमीही नाही. त्यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

गणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टरची अशी अवस्था होत आहे. तर दुचाकी व तीनचाकी वाहनाची काय अवस्था होत असेल?, यावरून दिसून येते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर