शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 12:52 IST

सांगली येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे.

ठळक मुद्देगर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटकसांगली, कोल्हापूर, जिल्ह्यात भ्रूणांचे दफन; तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथे खोदकाम

सांगली : येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. नागाव-कवठे (ता. तासगाव) येथील महिलेचा गर्भपात केलेले भ्रूण नातेवाईकांनी त्यांच्याच शेतात पुरल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान गर्भपात आणि भ्रूणांची हत्या करणारी मुख्य संशयित डॉ. रुपाली विजयकुमार चौगुले (वय ३९, रा. सिद्धीविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बँकेसमोर, विश्रामबाग, सांगली) हिला अटक करण्यात आली आहे.

डॉ. रुपाली विजयकुमार चौगुलेगणेशनगरमधील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केली जात असल्याचा धक्कादायक चार दिवसापूर्वी उघडकीस आला होता. डॉ. रुपाली चौगुले, तिचा पती विजयकुमार चौगुले व सख्खा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर तपास करीत आहेत.

विजयकुमार चौगुलेरुग्णालयावर छापा टाकून गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधी गोळ्या, इंजक्शन, गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर, दैनंदिन कामाच्या नोंदी असलेले रजिस्टर जप्त केले. ही कारवाई सुरु असताना डॉ. रुपाली चौगुले चक्कर येऊन कोसळली होती. गेली दोन दिवस तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चांगली झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच तिला रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. सोमवारी सकाळी तिला अटक दाखविण्यात आली. 

डॉ. स्वप्नील जमदाडे गर्भपात केलेल्या महिलांच्या नावाचे केसपेपर सापडले आहेत. यावरुन पोलीस त्यांच्याकडे चौकशी करीत आहेत. नागाव-कवठेतील एका महिलेचा केसपेपर सापडला. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना गाठून चौकशी केली. काही दिवसापूर्वी कुटूंबातील महिलेचा गर्भपात केल्याची कबूली नातेवाईकांनी दिली आहे.

तसेच डॉ. रुपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले यांनी गर्भपात केलेल्या भ्रुणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आमच्याकडेच सोपविली होती. त्यानुसार हे भ्रूण आमच्याच शेतात दफन केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस, महापालिकेचे आरोग्य पथक व न्यायवैद्यक पथक तातडीने नागाव-कवठेला रवाना झाले.

शेतात खोदकाम करुन दफन केलेल्या भूणाचा शोध सुरु ठेवला आहे. गर्भपात केलेल्या सर्वच भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडे सोपविली होती. हे नातेवाईक सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी भ्रूण त्यांच्यात भागात दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणीही भ्रूणांचा शोध सुरु ठेवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीkolhapurकोल्हापूरkonkanकोकण