शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तब्बल २३ वर्षांनंतर शिराळ्यात नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:38 IST

ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष

शिराळा : तब्बल २३ वर्षांनंतर शिराळा येथील ऐतिहासिक नागपंचमी उत्सवात मंगळवारी जिवंत नागांचे दर्शन भाविकांना झाले. मानाची पालखी, महिलांचे नागराज मंडळ, जिवंत नागदेवतेचे दर्शन, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सर्पाबद्दल जनजागृती, अशा अनेक गोष्टींचे दर्शन यावेळी येथे घडले.उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २००२ पासून प्रतीकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक काढून नागपंचमी साजरी केली जाते. मात्र, यावर्षी जिवंत नागदेवतेचे दर्शन होत असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. अंबामाता मंदिरात देवीचे दर्शन आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

पावसाची पर्वा न करता गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत पारंपरिक पद्धतीने पूजा, पालखी पूजा तसेच घरातील महिलांनी नाग मूर्तीची पूजा करून यावर्षी नागपंचमी उत्सव साजरा केला. पावसात तरुणाई संगीताच्या तालावर नाचत होती आणि जिवंत नागांचे दर्शन झाल्याने भाविकांच्या मनात उत्साह वाढला होता.नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून अंबा मातेचे दर्शन घेतले. मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मानाच्या पालखीचे पूजन प्रमोद महाजन, रामचंद्र महाजन यांच्या घरी झाले, त्यानंतर ही पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी निघाली.यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत उद्योग समूहाचे अध्यक्ष रणधीर नाईक, भाजप नेते सम्राट महाडिक, केदार नलावडे, पृथ्वीसिंह नाईक, देवेंद्र पाटील, रणजीतसिंह नाईक आदींनी पालखीचे पूजन केले.

सर्पदंशाची लसही उपलब्धआरोग्य विभागाकडून शिराळ्यात आवश्यक औषधांचा साठा तसेच सर्पदंशाची लस उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच पंधरा रुग्णवाहिका कार्यरत होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण नागपंचमी उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात होते. शिराळकरांनी स्वतःवर अनेक बंधने घालून या नागपंचमी उत्सवाचा अभिमानाने आणि संयमाने उत्सव साजरा केला.

ड्रोनच्या माध्यमातून परिसरावर लक्ष

  • केदार नलावडे यांच्या कच्च्याड मंडळा मार्फत नाथपंथी आघोरी डान्स आकर्षण ठरले.
  • मुख्य मार्गावर तसेच अंबामाता मंदिर अश्या २१ ठिकाणी नाग पकडण्यास परवानगी मिळालेले ग्रामस्थ निसर्गचक्रातील नागांचे महत्त्व,शिक्षण व समाज प्रबोधन करत नागरिकांना माहिती करुन देत होते. यामध्ये सर्व ग्रामस्थ महिला सहकार्य करीत होते.यावर्षी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
  • ड्रोन द्वारे शिराळा शहर तसेच तडवळे , उपवळे , मोरणा धरण , ओझर्डे , कुरळप, मांगले, सुरुल या संवेदनशील गावावर लक्ष ठेवण्यात आले होते.