शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

आधार कार्डचा डेटा लिक होण्याला घाबरताय?... तर मग मास्क्ड आधार कार्ड वापरा!

By संतोष भिसे | Updated: March 5, 2023 19:29 IST

आधार कार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर करुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत.

सांगली :

आधार कार्डच्या झेरॉक्सचा गैरवापर करुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मास्क्ड आधार कार्ड वापरण्याचे  आवाहन  शासनाने केले आहे.

प्रत्येक शासकीय, निमशासकीय आणि सार्वजनिक दस्ताऐवजामध्ये सध्या आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. आधार कार्ड सरसकट मागू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही मागणी होते. आपणही बिनधास्तपणे झेरॉक्स काढून देतो. सायबर फसवणुकीमध्ये त्याचा वापर होत असल्याचे आढळले आहे. गेल्या काही वर्षांत त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. बोगस कंपन्या सुरु करुन कोट्यवधींचा जीएसटी बुडविल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. आधार कार्डधारक व्यक्ती विनाकारण गुन्ह्यात अडकते. हे सर्व टाळण्यासाठी मास्क्ड आधार कार्ड उत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे.

काय आहे मास्क्ड आधार कार्ड?मास्क्ड आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड. त्यामध्ये १२ अंकी क्रमांकाऐवजी फक्त शेवटचे चार आकडे दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या घटनेनंतर शासनाने अशा प्रकारचे आधार कार्ड सुरु केले. ते अधिक सुरक्षित आहे. आधार प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येते. त्यावर तुमच्या पूर्ण आधार क्रमांकाचा उल्लेख नसतो. बाकी तपशील नेहमीच्या कार्डसारखाच असतो. उर्वरित नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि क्यूआर कोड आदी तपशील कायम असतो.कसे डाऊनलोड कराल?आधार प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन मास्कड आधार कार्ड डाउनलोड करता येते. पण त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक प्राधिकरणाकडे नोंदविलेला असायला हवा. आधार डाउनलोड करा" वर क्लिक केल्यानंतर “I have” विभागात  “आधार/व्हीआयडी/नोंदणी आयडी” हा पर्याय निवडावा.  “Select your Preference” पर्यायामधून Masked Aadhaar” वर क्लिक करावे. त्यानंतर इतर आवश्यक माहिती भरावी.  “Request OTP” वर क्लिक करावे. त्यानंतर “ I Agree” वर क्लिक करा. “Confirm” वर क्लिक केल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी येतो. तो सबमिट केल्यानंतर मास्क्ड आधार कार्ड मिळते.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार चित्रपटगृहे, हॉटेल्स, लॉज किंवा अन्य खासगी संस्था आधार कार्डची सक्ती करु शकत नाहीत. तरीही देण्याची वेळ आल्यास मास्क्ड आधार कार्डची झेरॉक्स द्यावी. ते शासनमान्य आहे. फसवणुक टळते.- भास्कर मोहिते, जिल्हा पालक, ग्राहक पंचायत. सांगली