शिराळा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक रग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:09+5:302021-04-10T04:26:09+5:30

शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभावेळी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Admission of state-of-the-art ambulance to Shirala Sub-District Hospital | शिराळा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक रग्णवाहिका दाखल

शिराळा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक रग्णवाहिका दाखल

शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभावेळी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील नागरिकांना तातडीचे उपचार मिळण्यासाठी आजपासून अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यान्वित केली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

शिराळा उपजिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या लोकार्पण समारंभावेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, शिराळा डोंगराळ तालुका आहे. काही महत्त्वाची गावे वगळता वाडी, वस्तीवर लोक राहतात. अलीकडच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने सोयी, सुविधा सक्षम केल्या आहेत. शिराळा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले आहे. तरीही आधुनिक व अत्यावश्यक सुविधेसाठी अजूनही येथील लोकांना सांगली, कोल्हापूर व कऱ्हाड शहरांकडे धाव घ्यावी लागते. रुग्णांना तातडीने शहराकडे अथवा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. माझ्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये किमतीची या रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड आदी सोयी आहेत. ती आजपासून रुग्णसेवेत दाखल झाली आहे.

वैद्यकीय अधीक्षक जुबेर मोमीन यांनी स्वागत केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी रुग्णवाहिकेबाबत माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता माने, डॉ. विनायक धस, डॉ. मनोज महिंद उपस्थित होते.

Web Title: Admission of state-of-the-art ambulance to Shirala Sub-District Hospital