महाडिक अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:35+5:302020-12-11T04:53:35+5:30

इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलकडून घेण्यात येणारी प्रथम व थेट वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ...

Admission process in Mahadik Engineering started | महाडिक अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया सुरू

महाडिक अभियांत्रिकीत प्रवेश प्रक्रिया सुरू

इस्लामपूर : महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलकडून घेण्यात येणारी प्रथम व थेट वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी अधिकृत पडताळणी केंद्र म्हणून नानासाहेब अभियांत्रिकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मान्यता मिळाली आहे. ही प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे यांची विद्यार्थी व पालक यांना माहिती मिळावी तसेच या प्रक्रियेमध्ये त्यांना सहकार्य व्हावे, यासाठी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र स्थापन केले असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा. महेश जोशी यांनी दिली.

ते म्हणाले, यावर्षी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये थोडासा बदल झाला असून, ऑनलाईन माध्यमातून भर देण्यात आला आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दि. १५ डिसेंबरपर्यंत, तर थेट द्वितीय इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दि. १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे संयोजन केले जाते. म्हणूनच इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कॉलेजच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय उपलब्ध आहे. काही नवीन वैशिष्ट्यांसह येत्या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालय सज्ज असून, सुधारित प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. ए. मिरजे, उपप्राचार्य प्रा. नीलेश साने यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Admission process in Mahadik Engineering started