सांगलीच्या विजयसिंहराजेंनी घेतले आदित्य अभ्यंकरला दत्तक
By अविनाश कोळी | Updated: January 23, 2024 14:19 IST2024-01-23T14:18:34+5:302024-01-23T14:19:49+5:30
सांगली : सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आदित्य याला दत्तक ...

सांगलीच्या विजयसिंहराजेंनी घेतले आदित्य अभ्यंकरला दत्तक
सांगली : सांगलीचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी पंचायतन गणपती संस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आदित्य याला दत्तक घेतले. दत्तक विधान सोहळा नुकताच येथील माळबंगल्यावर पार पडला.
राजघराण्यातील सदस्य व निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. आदित्य अभ्यंकर हे विजयसिंहराजे यांच्या पत्नी राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांचे भाचे जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आहेत. यावेळी विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, पौर्णिमाराजे पटवर्धन, जयदीप अभ्यंकर व त्यांचे कुटुंबीय तसेच मिरजेचे बाळासाहेब पटवर्धन, गोपाळराजे पाटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, बेळगावचे आमदार अभय पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, अॅड. श्रीकांत जाधव, दीपक शिंदे, अॅड. शेखर जगताप, अँड. सुहास शेठ आदी उपस्थित होते.