शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुहैल शर्मा म्हणाले, विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 16:38 IST

दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्‍यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अन्यथा कडक कारवाई

सांगली : जिल्ह्यातील जनतेने गेल्या महिन्याभरापासून दाखविलेला संयम व शिस्तीमुळे जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नसल्याने नागरिकांनी लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊ नये. दुकाने सुरू करतानाही सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणारी दुकाने तात्काळ बंद करण्यात येतील. शिवाय विनाकारण फिरणाार्‍यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला.

लॉकडाऊनला मिळालेल्या शिथीलतेच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने दाखविलेल्या शिस्तीमुळे कोरोना रूग्णांची संख्या मर्यादीत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असलीतरी कोरोनाचे संकट अजून टळले नाही. त्यामुळे दुकाने सुरू करतानाही नियमांचे पालन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सोशल डिस्टनसिंग मॅनेजमेंट टिम तयार करण्यात येणार आहे. ही टीम सर्वत्र फिरून नियमांचे पालन होते की नाही याची पाहणी करणार आहे.

दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर रंगाने चौकोन तयार करणे बंधनकारक असून दुकानातही ग्राहक व दुकानदारात तीन फूटाचे अंतर असावे. शिवाय ग्राहक व दुकानदार दोघांनीही मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे पालन न करणारी दुकाने त्वरीत बंद करण्यात येतील.

दुचाकीवर एकच व्यक्ती तर चारचाकीतून दोन व्यक्तींनी प्रवास करावयाच असून याचे उल्लंघन करणार्‍यांवरही आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सीमा लॉक असणार असून प्रत्येकाची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी सर्व नाक्यांवर पोलीसांचे पथक कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस