कवठेमहांकाळला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पुरेसा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:47+5:302021-05-05T04:42:47+5:30
पालकमंत्री पाटील यांनी येथे आढावा बैठक घेतली. बैठकीस आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...

कवठेमहांकाळला ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पुरेसा पुरवठा
पालकमंत्री पाटील यांनी येथे आढावा बैठक घेतली. बैठकीस आ. सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी, विभागीय अधिकारी समीर शिंगटे, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, सभापती विकास हाके, शिक्षण सभापती आशा पाटील उपस्थित होते.
तहसीलदार बी. जे. गोरे, आरोग्य अधिकारी डाॅ. दत्तात्रय पाटील, विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डाॅ. संतोष मोरे यांनी अहवाल सादर केला.
कोरोनाची जास्त रुग्णसंख्या असलेल्या गावात जास्त लक्ष द्यावे, पोलिसांनी गावोगावी सतर्क राहावे, नगर पंचायतीने प्रशासनाला सहकार्य करावे, लसीकरणासाठी गर्दी न करता नोंदणीप्रमाणे बोलवावे, रुग्णांना गावात फिरण्यास मनाई करण्यात यावी, ग्रामदक्षता समितीने सतर्क राहावे, कवठेमहांकाळ येथील जनता कर्फ्यूवेळी भाजीपाला विक्रेत्यांनी फिरून भाजीपाला विक्री करावी, तसेच कवठेमहांकाळ शहराप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील गावोगावी जनता कर्फ्यू लावण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या.
माजी सभापती चंद्रकांत हाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, भाजपचे नेते हायूम सावनूरकर, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब गुरव, तालुकाध्यक्ष संजय हजारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, नगरसेवक लालासाहेब वाघमारे, पांडुरंग पाटील उपस्थित होते.