शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, बहुतांशी कार्यकर्तेही 'खोबरे तिकडे चांगभलं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:52 IST

पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदमध्ये नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे दिसून आल्याने महायुतीला मोठा फटका

अशोक पाटीलईश्वरपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सध्या वाळवा-शिराळा तालुक्यातील विविध नेते आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत विविध खेळ्या करत असल्याचे अंतर्गत स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे करतात. त्यामुळे कार्यकर्ते आता कोलांट उड्या मारू लागले आहेत. बहुतांशी कार्यकर्त्यांची भूमिका खोबरे तिकडे चांगभलं अशीच असल्याचे स्पष्ट होत आहे.वाळवा तालुक्यात आजही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत उरूण-ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदमध्ये नेत्यांच्या भूमिका आपल्या सोयीप्रमाणे दिसून आल्याने महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात नेते आपापल्या सोयीप्रमाणे राजकारण करताना दिसतात. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदार खोबरे तिकडे चांगभलं अशीच भूमिका घेतात.वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यांच्याकडे आष्टा नगरपालिका आणि परिसरातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात दिवंगत विलासराव शिंदे यांचा गट एकत्रित आहे. या विरोधात हुतात्मा संकुलनाचे नेते गौरव नायकवडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आ. सदाभाऊ खोत यांच्या भूमिका विरोधात आहेत. त्यामुळेच महायुतीकडे नेतृत्वाचा अभाव आहे.अशीच अवस्था शिराळा तालुक्यात आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आ. मानसिंगराव नाईक यांचा गट सक्षम असला तरी त्यांच्या विरोधात भाजपचे आ. सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप पुरस्कृत आ. सदाभाऊ खोत आदी नेते एकवटून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत.दोन्ही राष्ट्रवादींचे मिलन!वाळवा आणि शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा गट आहे. परंतु दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचीही भूमिका महत्त्वाची आहे.अशी आहे जिल्हा परिषद गट व गणाची रचनावाळवा तालुक्यात एकूण १२ जिल्हा परिषद गट येतात. त्यामध्ये रेठरेहरणाक्ष, बोरगाव, कासेगव, वाटेगाव, पेठ, वाळवा, कामेरी, चिकुर्डे, बावची, बागणी, येलूर येत असून याच तालुक्यात २२ पंचायत समिती गण आहेत. तर शिराळा तालुक्यात पणुंब्रे वारुण कोकरूड, वाकुर्डे, मांगले असे ४ जिल्हा परिषद गट त्यामध्ये ८ पंचायत समिती गण आहेत. निवडणुकीचा कालावधी अगदीच अल्प असल्याने अद्यापि उमेदवार निश्चित झाले नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: Leaders' Convenient Roles, Workers Follow Where the Wind Blows

Web Summary : Sangli's local politics see leaders shifting allegiances for convenience as local elections approach. This fluidity impacts alliances in Walwa and Shirala, with many workers backing whoever seems advantageous. Key players like Jayant Patil and opposing factions are vying for control, creating a dynamic political landscape.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलSadabhau Khotसदाभाउ खोत Satyajit Deshmukhसत्यजित देशमुखMansingrao Naikमानसिंगराव नाईक