शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:15 IST

गांधीनगर (ता. करवीर) येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर) या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या ७५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर/गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी, ता. करवीर) या तरुणाला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ५००, २००, १०० व ५० रुपयांच्या ७५५० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

गांधीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अभिजित पवार हा शुक्रवारी (दि. १८) बनावट नोटांची विक्री करण्यासाठी गांधीनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने गांधीनगर रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. पवार या ठिकाणी आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे भारतीय चलनासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या ५०० रुपयांच्या आठ, २०० रुपयांच्या आठ, तर शंभर रुपयांच्या १७ व ५० रुपयांच्या पाच अशा सुमारे ७५५० रुपयांच्या नोटा सापडल्या.

या नोटा संशयित विश्वनाथ सुहास जोशी व प्रवीण अजितकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) यांनी सांगलीत तयार करून त्याला विक्री करण्यासाठी दिल्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या टोळीकडून आणखी बºयाच नोटा चलनात आणल्या असल्याची शक्यता आहे. ही कारवाई करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम, सहायक फौजदार राजू भोसले, आकाश पाटील, महादेव रेपे, नारायण गावडे, आयुब शेख, उदय खुडे यांनी केली. अतुल कदम तपास करीत आहेत.सांगलीत छापासांगलीतील शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत एका बंगल्यावर छापा टाकून नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून या कारवाईवेळी पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. गांधीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केलीआहे.

बनावट नोटाप्रकरणी सांगलीत बंगल्यावर छापाएकजण ताब्यात : गांधीनगर पोलिसांची कारवाई; स्कॅनर, प्रिंटर जप्तसांगली : येथील शामरावनगरमधील अरिहंत कॉलनीत एका बंगल्यावर छापा टाकून नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून, या कारवाईवेळी पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. गांधीनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा तपशील सांगण्यास गांधीनगर पोलिसांनी नकार दिला.

गेल्या सहा महिन्यांपासून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत बनावट नोटा बाजारात आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन-तीन टोळ्यांना जेरबंदही केले आहे. दोनच दिवसांपूर्वी सांगलीत संजयनगरच्या आठवडा बाजारात दोनशे रुपयांच्या पाच बनावट नोटा खपविल्याचा प्रकार घडला होता. शामरावनगरमध्ये अरिहंत कॉलनीत एका बंगल्यात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करण्याचा कारखाना असल्याची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक शनिवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. या पथकाने बंगल्यावर छापा टाकला. तब्बल दोन तास घराची झडती सुरु होती. यामध्ये पाचशेच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्याचे समजते. याशिवाय नोटांच्या छपाईसाठी लागणारा स्कॅनर, प्रिंटरही जप्त केला आहे. एकाला ताब्यात घेऊन हे पथक कोल्हापूरला रवाना झाले. यामध्ये एका राजकीय पदाधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. गांधीनगर पोलिसांशी संपर्क साधला, पण त्यांनी कारवाई सुरु आहे, असे सांगून तपशील सांगण्यास नकार दिला.

सांगली पोलीस अनभिज्ञसांगलीत बनावट नोटांप्रकरणी कारवाई करताना गांधीनगर पोलिसांनी सांगली पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई केली; पण कारवाईची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने शामरावनगरला धडक दिली. ज्या बंगल्यावर कारवाई झाली, तो बंगला शोधण्यासाठी त्यांना तासभर लागला.

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसाfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी