नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST2021-04-17T04:27:08+5:302021-04-17T04:27:08+5:30

कुपवाड : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक उत्पादन घेणारे आणि सध्या एक्स्पोर्ट सुरू असलेले उद्योग व त्यांना कच्या मालाचा ...

Action on industries violating the rules | नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई

कुपवाड : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक उत्पादन घेणारे आणि सध्या एक्स्पोर्ट सुरू असलेले उद्योग व त्यांना कच्या मालाचा पुरवठा करणारे उद्योग सुरू राहतील. मात्र, जे उद्योग वरीलप्रमाणे कोणत्याही वर्गवारीमध्ये बसत नाहीत, त्यांना उद्योग सुरू करता येणार नाहीत. ज्यांच्या कारखान्यात कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे, असेच इतर उद्योग सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी उद्योजकांच्या बैठकीत दिला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली

जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, बामनोली इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड, सदाशिव मलगान, मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष संजय अराणके, माधव कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाथिकारी चौधरी म्हणाले की, अत्यावश्यक उत्पादन घेणारे उद्योग, एक्स्पोर्ट उद्योग, पॅकिंग उद्योग, सलग प्रक्रियामधील उद्योग व त्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करणारे उद्योग सुरू राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या उद्योगांनी अत्यावश्यक व सलग प्रक्रिया उद्योगांची जिल्हा उद्योग केंद्राकडून घेतलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येईल, तसेच जे उद्योग वरीलप्रमाणे कोणत्याही वर्गवारीमध्ये बसत नाहीत, त्यांना उद्योग सुरू करता येणार नाहीत; परंतु ज्यांच्या कारखान्यात कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे, असे उद्योग सुरू राहतील, असे सूचित करण्यात आले आहे.

चाैकट

तपासणीसाठी पथके तयार

यापुढील काळात कारखानदारांकडून कोरोनासंबंधी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यावर लक्ष ठेवयासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात पाहणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक महामंडळ यांच्यामार्फत तपासणी पथके तयार केली आहेत. उद्योजकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी अथवा कोणत्या अडचणी असतील तर असोसिएशन, चेंबर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योजकांनी केले आहे.

Web Title: Action on industries violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.