शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बेकायदेशीर दारू, जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाचवेळी ...

सांगली : जिल्ह्यातील विविध भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकाचवेळी धडक कारवाई करत अवैध व्यावसायिकांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत दारू व जुगारप्रकरणी ३५ जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन लाख ८२ हजार १९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एलसीबीच्या पथकाने एकाचवेळी केलेल्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी प्रत्येक विभागात वेगवेगळी टिम करून अवैध धंद्यांवर कारवाईचे नियोजन केले. एलसीबीने सुरू केलेल्या या धडक कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

एलसीबीने केलेल्या कारवाईत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर १९ गुन्हे दाखल करत त्यांच्याकडून ६७८ दारु बाटल्या, ५७ लीटर गावठी दारू, कच्चे रसायन ११२५ लीटर असा ९२ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैधपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करताना १६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात जुगार साहि्त्य, मोबाईल असा दोन लाख ८९ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिरज शहरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ५ जणांना अटक करण्यात आली.