शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अश्लील फोटो व्हायरलची धमकी; गुन्ह्यातून सुटलेल्या आरोपीचा पीडितेवर पुन्हा लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 15:44 IST

कवठेएकंदच्या तरुणावर गुन्हा

सांगली : पीडित तरुणीने दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तिला धमकावून लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडितेने कोणाबरोबरही लग्न करू नये अन्यथा पतीला अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने संशयित मोईन सिराज नदाफ (रा. कवठेएकंद, ता. तासगाव) याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यातील तरतुदीनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणीच्या दुबळेपणाचा फायदा उठवून संशयित मोईन नदाफ याने पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्या गुन्ह्यात मोईन याला अटक झाली. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडितेचा पाठलाग सुरू केला. पीडिता मार्च २०२४ मध्ये खरेदीच्या निमित्ताने सांगलीत आल्याचे समजताच मोईन याने तिला गाठले. ‘तू माझ्यावर गुन्हा का दाखल केलास’ असा जाब विचारला. तो गुन्हा मागे घेऊन तुला माझ्याबरोबर बोलावेच लागेल, असे धमकावले. तू तसे केले नाहीस तर मोबाइलमधील तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करीन अशी धमकी दिली. त्या आक्षेपार्ह फोटोची भीती घालून मोईन याने तिला नदीकाठी, आमराईत त्याच्याबरोबर येण्यास भाग पाडले. तिच्याशी अश्लील चाळे केले. त्यानंतर कोल्हापूर रस्त्यावरील एका लॉजवर दि.१९ जुलै २०२४ रोजी तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला ‘तू कोणाशीच लग्न करायचे नाही. तू लग्न केले तर तुझ्या होणाऱ्या पतीला हे फोटो आणि व्हिडीओ दाखवणार आहे. माझ्या अटी मान्य केल्यास तर मी तुझ्याशी लग्न करतो, असे त्याने बजावले. त्यावेळी पीडितेने त्याच्या अटी धुडकावून तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून त्याच्यापासून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित मोईन नदाफ याने तिचा पाठलाग करून शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली आहे. अखेर पीडितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोईनवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस