मिरज ‘सिव्हिल’मधून दरोड्यातील आरोपीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:01+5:302021-07-09T04:18:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयातून आनंदा रामा काळे (वय ३५, रा. मल्लेवाडी) या कोरोना ...

मिरज ‘सिव्हिल’मधून दरोड्यातील आरोपीचे पलायन
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयातून आनंदा रामा काळे (वय ३५, रा. मल्लेवाडी) या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या दरोड्यातील आरोपीने बुधवारी मध्यरात्री पलायन केले. महिन्यापूर्वी त्याला दरोड्यातील गुन्ह्यात मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक करुन सांगली कारागृहात पाठवले होते.
आनंदा काळे याला कारागृहात कोरोनाची लागण झाल्याने चार दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी रात्री १२ ते एकच्या दरम्यान तो रुग्णालयातून पळून गेल्याने खळबळ उडाली. काळे याच्या शोधासाठी पोलिसांची दिवसभर धावपळ सुरु होती. मात्र, तो सापडला नाही.
मिरज ग्रामीण पोलिसांनी पंढरपूर रस्त्यावर दरोड्याच्या प्रकरणात आनंदा काळेला अटक केली होती. याबाबत गांधी चाैक पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज ‘सिव्हिल’मधून गतवर्षीही कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या आरोपीने पलायन केले होते.