शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मेसेज करून मध्यरात्री घराबाहेर बोलावले, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:38 IST

सकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने पोलिस ठाणे गाठले होते

सांगली : अल्पवयीन मुलीस उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी चंद्रकांत मधुकर लोंढे (वय २६, रा. सोनी, ता. मिरज) याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे आरती देशपांडे-साटवलीकर यांनी खटला चालवला.खटल्याची हकीकत अशी, आरोपी चंद्रकांत लोंढे याचा पीडित मुलीशी संपर्क होता. चार वर्षांपूर्वी २०२१ मध्ये त्याने पीडितेला मोबाइलवरून मेसेज करून मध्यरात्रीनंतर घराबाहेर बोलावले. त्यानंतर मिरज तालुक्यातील एका गावातील शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरात दिसत नसल्यामुळे तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाणे गाठले.

त्याचवेळी पीडितेस आरोपी चंद्रकांत यांच्या चुलत्याने घरी आणून सोडले. यानंतर पीडितेच्या भावाने तिला घेऊन पोलिस ठाणे गाठले. तेथे घडलेली हकीकत पीडितेने पोलिसांना सांगितली. आरोपी चंद्रकांत याच्याविरुद्ध अपहरण व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. महिला सहायक पोलिस निरीक्षक पी. सी. बाबर यांनी तपास केला.खटला न्यायालयात सुनावणीस आल्यानंतर सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता आणि तिची आई यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पीडिता घटनेवेळी अल्पवयीन होती. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या साक्षी आणि पुराव्याला अनुसरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहंती यांनी आरोपी चंद्रकांत लोंढे यास दोषी धरले. त्यास दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे श्यामकुमार साळुंखे, पैरवी कक्षातील रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ आदींचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले.

पीडितेला नुकसानभरपाई द्यापीडितेवर झालेल्या अत्याचारापोटी तिला भरीव नुकसानभरपाई शासनाकडून मिळण्याबाबतचे आवश्यक ते निर्देश यावेळी न्यायाधीश मोहंती यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Teenager lured, attempted rape; accused gets ten years jail.

Web Summary : A 26-year-old man from Miraj, Chandrakant Londhe, received a ten-year sentence for attempting to rape a minor. He lured her out at night and tried to assault her. The court also ordered compensation for the victim.