शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू, ट्रॅक्टरच्या धडकेत माळवाडीच्या माजी उपसरपंचासह दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 18:26 IST

दिवसभर मित्रपरिवार त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत होता. अचानक रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला

पलूस : माळवाडी (ता. पलूस) येथे ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता हा अपघात घडला. माळवाडीचे माजी उपसरपंच अजिंक्यकुमार वसंत कदम (वय २९) व अनिकेत संजय माने (वय २८, दोघेही रा. माळवाडी) अशी मृतांची नावे आहेत. मृत अनिकेत याचा मंगळवारीच वाढदिवस होता. वाढदिनीच त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता.माळवाडीचे माजी उपसरपंच असलेले अजिंक्यकुमार कदम व अनिकेत माने दोघेही अनिकेत याच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बीक्यू ८३८७) कामानिमित्त पलूसला गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास ते माळवाडीस परतत होते. आमणापूरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज त्यांना आला नाही. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दोघेही दुचाकीसह उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निपचित पडले. नागरिकांनी तात्काळ दोघांनाही पलूस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अपघाताची माहिती मिळताच पलूस पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत अनिकेत याचा मंगळवारीच वाढदिवस होता. दिवसभर मित्रपरिवार त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत होता. अचानक रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांना धक्का बसला. रुग्णालयात नातेवाइकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा अपघाताची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात