माडग्याळमध्ये अपघात; तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:14+5:302021-06-19T04:19:14+5:30

संख : माडग्याळ (ता. जत) येथील लकडेवाडी रस्त्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. त्यामध्ये ...

Accident in Madagyal; Three injured | माडग्याळमध्ये अपघात; तिघे जखमी

माडग्याळमध्ये अपघात; तिघे जखमी

संख : माडग्याळ (ता. जत) येथील लकडेवाडी रस्त्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तिघे जखमी झाले आहेत. त्यामध्ये एकाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजता झाली.

मल्लाप्पा येगू चव्हाण (वय ५८, रा. नवटाकवाडी माडग्याळ) हे माडग्याळ येथून मोटारसायकलवरून शेतातील घरी जात होते, तर लकडेवाडीवरून अंकुश कुंडलिक पडोळकर व म्हाळाप्पा कोंडीबा वाघमोडे (रा. लकडेवाडी) मोटारसायकलीवरून (एम.एच.१० डी एन-८१४०) माडग्याळला येत होते. लकडेवाडी-माडग्याळ रस्त्यावर दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मल्लाप्पा चव्हाण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जत येथे हलवण्यात आले, तर अंकुश पडोळकर व म्हाळाप्पा वाघमोडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: Accident in Madagyal; Three injured