शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
2
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
3
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
4
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
5
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
6
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
7
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
8
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
9
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
10
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
12
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
13
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
14
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
15
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
16
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
17
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
18
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
19
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
20
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद

एमबीबीएस, दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विराम; सहा महिने प्रक्रिया रेंगाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:45 IST

आयुर्वेदची अंतिम टप्प्यात  

सांगली : देशात ५ मे २०२४ ‘नीट’ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया मंगळवारी ५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. तब्बल सहा महिने प्रक्रिया रेंगाळल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षाला विलंब झाला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात प्राध्यापक व विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम पूर्ण करताना कसरत होण्याची चिन्हे आहेत.यंदा ४ जून २०२४ रोजी नीट परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर पेपरफुटी, परीक्षेतील गैरव्यवहार, चुकीचे बोनस गुण देणे यामुळे नीट २०२४ची परीक्षा ही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला नीट परीक्षा निकाल तीन वेळा बदलणे भाग पडले. त्यामुळे देशपातळीवरील आणि राज्य पातळीवरील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला. शेवटी मंगळवारी तब्बल सहा महिन्यांनी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समाप्त झाली.

आयुष कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू असून, ती २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. नीट परीक्षेचा गोंधळ, लांबलेली प्रवेश प्रक्रिया आणि वाढलेले मेरिट यामुळे ही प्रक्रिया वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक सर्वच पालकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी ठरली. यंदा नवीन आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून ८००, तर एका खासगी महाविद्यालयातून ५० जागा वाढल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा मेरिट वाढल्याने अनेक विद्यार्थ्यांना इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागला, तर काहींना पुढच्या वर्षीच्या नीटची फेरपरीक्षा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.फी सवलतीचा परिणामगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कट ऑफ ५० ते ६० गुणांनी, तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा सुमारे ६५ ते ७१ गुणांनी वाढला. मुलींना १०० टक्के फी माफीच्या सवलतीचा परिणाम यावर्षीच्या खासगी महाविद्यालयांचा कट ऑफ वाढण्यावर झाला. यावर्षी मराठा समाजाला दिलेले एस.ई.बी.सी. प्रवर्गाच्या आरक्षणामुळे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थी