शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST

कासेगाव : वाळवा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पाठलाग व दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार ...

कासेगाव : वाळवा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पाठलाग व दमदाटी करून वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार कासेगाव पोलिसात दाखल झाली आहे. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. गणेश लक्ष्मण जाधव (वय २५, रा. तांबवे. ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असून त्याला कासेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाळवा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पालकांसोबत भाड्याच्या घरात वास्तव्यास आहे. संशयित गणेश जाधव हा त्याच्या मामाच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने वारंवार त्या गावी येत होता. त्यातूनच त्या मुलीशी त्याची ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत तो तिचा पाठलाग करू लागला. मॉर्निंग वॉकला ती गेली असता तो तिच्या पाठीमागे जात होता. हा प्रकार अनेक दिवस सुरू हाेता. पीडित मुलगी आपल्याला भाव देत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. दमदाटी करून त्याने तिला भीती घातली. यास ती मुलगी बळी पडली. याचाच फायदा घेत त्याने तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केले. दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. या वेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. पालकांनी विश्वासात घेतले असता तिने संशयित गणेश जाधव याच्या अत्याचाराची माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ कासेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची दखल घेत संशियत गणेश जाधव यास ताब्यात घेतले.

दरम्यान, कासेगाव पोलिसांनी गणेश जाधव यास न्यायालयात उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस ठाण्यात कृष्णात पिंगळे हे करत आहेत.